झाडांवर चक्क उगवतो 'कान'; वाचा काय आहे प्रकरण

सध्या युरोपमधील एका झाडाची खुप चर्चा होतेय कारण या झाडावर माणसाचे कान उगवतात.
Human Ear Shaped Fungus
Human Ear Shaped Fungus sakal
Updated on

निसर्गाचे अनेक नवनवीन रुपं आपण पाहिले असावेत पण सध्या युरोपमधील एका झाडाची खुप चर्चा होतेय कारण या झाडावर माणसाचे कान उगवतात. तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे, पण हे खरंय आहे. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण यासाठी तुम्हाला संपुर्ण प्रकरण समजून घ्यावं लागेल. (do you know human ear shaped fungus which is seen in Europe)

युरोपमधील या झाडावर माणसाचे कान दिसतात. पण हे खरेखुरे मानवी कान नसून कानासारखी दिसणारी बुरशी आहे. ज्याला Human Ear Shaped Fungus सुद्धा म्हणतात तर काही लोक याला ‘जेली इअर’ म्हणतात. साधारणत: जेली इअर (Jelly Ear) बुरशीचा 3.5 इंच लांब आणि 3 मिमी जाड असून कानाच्या आकाराची असते.

Human Ear Shaped Fungus
नाटोच्या भूमिकेवर रशिया, चीन नाराज
Human Ear Shaped Fungus
युक्रेनच्या मदतीला बकरी आली धावून; रशियाचे ४० सैनिक गंभीर जखमी

हे जेली इअर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतंय. झाडावर लटकत दिसत असलेला कान ही एक प्रकारची बुरशी आहे. १९ व्या शतकापासून या बुरशीचा वापर औषध म्हणून केला जातो. कावीळसारख्या या आजारांवर तिचा उपयोग होत होतो. युरोपमध्ये संपूर्ण वर्षभर ही बुरशी औदुंबराच्या झाडावर दिसते.

Human Ear Shaped Fungus
इस्रायलमध्ये राजकीय संकट; 4 वर्षात पाचव्यांदा होणार निवडणुका

सध्या हे बुरशी आकर्षणाचं केंद्रबिंदू आहे. पोषणयुक्त असलेली ही जेली खावी की नाही, यावर बराच वाद रंगला होता. कच्ची जेली इअर खाता येत नाही. या जेली इअरला खाण्यासाठी शिजवावं लागतं त्यानंतर वाळवावं लागतं त्यानंतर त्यातून भरपूर पोषणमूल्यं मिळतात.

चीन आणि पूर्व आशियातल्या देशांमध्ये याची आधी शेती केली जात असायची त्यानंतर ही बुरशी युरोपात औदुंबराच्या झाडावर यायला लागली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.