Donald Trump: गंभीर गुन्ह्यात दोषी ठरणारे ट्रम्प ठरले पहिले माजी अध्यक्ष; हश मनी प्रकरण नेमकं काय आहे?

Donald Trump hush money payments : हश मनी प्रकरणात कोर्टाने ट्रम्प यांना दोषी ठरवलं आहे. एकूण ३४ आरोपांमध्ये त्यांना दोषी ठरवण्यात आलं आहे.
Donald Trump
Donald Trump
Updated on

वॉशिंग्टन- अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यातच अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. हश मनी प्रकरणात कोर्टाने ट्रम्प यांना दोषी ठरवलं आहे. एकूण ३४ आरोपांमध्ये त्यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर हा त्यांना मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

डोनाल्ड ट्रम्प गंभीर गुन्हेगारी प्रकरणामध्ये दोषी आढळलेले अमेरिकेचे पहिली माजी अध्यक्ष आहेत. अमेरिकेच्या इतिहासात असं यापूर्वी कधीच झालं नसल्याचं सांगण्यात येतं. जूरीने निर्णय घेण्याआधी १० तास यावर विचार-विमर्श केला. त्यानंतर आपला निर्णय दिला. डोनाल्ड ट्रम्प यांना नेमकी काय शिक्षा होईल यावर ११ जुलै रोजी सुनावणी होईल. ट्रम्प हे अध्यक्षपदासाठीचे प्रबळ दावेदार आहेत.

Donald Trump
Donald Trump: ट्रम्प बॉक्सर अन् टी-शर्टवर आले, निरोध देखील वापरला नाही; पॉर्न स्टारने केले अनेक खुलासे

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपले वकील कोहेन यांच्या माध्यमातून पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनिएल्सला पैसे दिल्याचा आरोप आहे. त्यांचे गुपित उघड न करण्यासाठी हे पैसे दिल्याचं सांगितलं जातं. डोनाल्ड ट्रम्प हे २०१६ मध्ये अध्यक्षपदी निवडले जाण्याच्या आधीचं हे प्रकरण आहे. ट्रम्प यांचे वकील कोहेन हे त्यांच्याविरोधात गेले आहेत. १२ सदस्याच्या ज्यूरीने ट्रम्प प्रकरणात निर्णय दिला.

Donald Trump
Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांचा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत समावेश; किती आहे संपत्ती?

प्रकरण नेमकं काय?

डोनाल्ड ट्रम्प यांनी २०१६ मध्ये एका सेक्स स्कँडल प्रकरणातून वाचण्यासाठी पॉर्नस्टार स्टॉर्मी डॅनियल्सला पैसे दिल्याचा आरोप आहे. डोनाल्ड ट्रम्प हे त्यावेळी रिपब्लिकन पक्षाकडून अध्यक्षपदाची निवडणूक लढवत होते. सेक्स स्कँडल समोर आल्यास त्याचा मोठा परिणाम त्यांच्या उमेदवारीवर पडण्याची शक्यता होती. त्यामुळे त्यांनी याप्रकरणी गैरव्यवहार केल्याचं सांगितलं जातं.

डोनाल्ड ट्रम्प याप्रकरणी दोषी आढळल्यास त्यांना चार वर्ष तुरुंगात राहावं लागू शकतं. अमेरिकेच्या संविधानानुसार गंभीर गुन्ह्यातील दोषी व्यक्तीला अध्यक्ष होता येत नाही. मात्र, याप्रकरणी ट्रम्प पुढच्या कोर्टामध्ये निर्णयाला आव्हान देणार आहेत. त्यामुळे याप्रकरणी जोपर्यंत अंतिम निकाल येत नाही तोपर्यंत ते अध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याचा विचार करु शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.