Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांना आणखी एका मोठा धक्का; 2024 च्या निवडणुकीबाबत ईशान्येकडील मेन या राज्याने घेतला मोठा निर्णय

कोलोरॅडोनंतर आणखी एका राज्याने ट्रम्प यांना अध्यक्षीय प्राथमिक निवडणुकीपासून रोखले आहे. जानेवारी 2021 मध्ये यूएस कॅपिटलवर झालेल्या हल्ल्यात त्यांचा सहभाग असल्याने सर्वोच्च निवडणूक अधिकाऱ्याने त्यांना निवडणुकीसाठी अपात्र घोषित केले होते.
Donald Trump
Donald Trump eSakal
Updated on

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नुकतेच कोलोरॅडो कोर्टाने पुढील वर्षीच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी अपात्र घोषित केलं आहे. आता कोलोरॅडोनंतर आणखी एका राज्याने ट्रम्प यांना अध्यक्षीय प्राथमिक निवडणुकीपासून रोखले आहे. जानेवारी 2021 मध्ये यूएस कॅपिटलवर झालेल्या हल्ल्यात त्यांचा सहभाग असल्याने सर्वोच्च निवडणूक अधिकाऱ्याने त्यांना निवडणुकीसाठी अपात्र घोषित केले होते.आधी कोलोरॅडो आणि आता अमेरिकन राज्य मेनने गुरुवारी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षीय प्राथमिक निवडणुकीपासून रोखले.(Donald Trump Blocks From US Presidential Polls)

मेन राज्य सेक्रेटरी ऑफ स्टेट शेना ली बेलोज यांनी 2021 च्या कॅपिटल हिल दंगलीत ट्रम्पच्या भूमिकेमुळे 'संवैधानिक बंड' या तरतुदीचा हवाला देत 2024 च्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीत ट्रम्प उभे राहू शकत नाहीत असा निर्णय दिला आहे.या निर्णयामुळे ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार होण्यासाठी मेन राज्यात होणाऱ्या प्राथमिक निवडणुकीत सहभागी होऊ शकत नाहीत.

Donald Trump
Donald Trump: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का! कोर्टाने निवडणूक लढवण्यास घातली बंदी

अशाप्रकारे कोलोरॅडोनंतर ट्रम्प यांना निवडणुकीत भाग घेण्यास बंदी घालणारे मेन हे दुसरे राज्य बनले आहे. मात्र, या दोन्ही राज्यांच्या निर्णयांना आता न्यायालयात आव्हान दिले जाण्याची शक्यता आहे.

34 पानांच्या निर्णयात बेलोज म्हणाले की, यूएस राज्यघटनेच्या 14 व्या दुरुस्तीमुळे ट्रम्प यांना मेनच्या मतपत्रिकेतून काढून टाकण्यात यावे. या दुरुस्तीनुसार 'बंडखोरी किंवा बंडखोरीमध्ये गुंतलेली' कोणतीही व्यक्ती पदावर राहण्यास पात्र नाही.

Donald Trump
Russia-Ukraine war: पंतप्रधान मोदींचं नाव घेऊन युक्रेन वादावर रशियाचे अध्यक्ष पुतीन स्पष्टच बोलले; ''वाद मिटवण्यासाठी...''

अमेरिकेच्या कोलोरॅडो कोर्टाने निवडणूक लढवण्यास घातली बंदी

कॅपिटल हिंसाचार प्रकरणात दोषी मानत कोर्टाने त्यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी अपात्र घोषित केलं आहे. त्यामुळे आता ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवता येणार नाही. याशिवाय निवडणुकीत मतदान देखील करता येणार नाही. अमेरिकेच्या कोलोरॅडो हायकोर्टाने मंगळवारी हा निर्णय दिला आहे. त्याचबरोबर . रिपब्लिकन अध्यक्षीय प्राथमिक मतपत्रिकेतून त्यांचे नाव वगळण्याचे आदेशही न्यायालयाने राज्य सचिवांना दिले आहेत.

Donald Trump
Year Ender 2023: वर्षभरातील 5 मोठ्या जागतिक घटना, ज्यामुळे भारतावर पडला थेट परिणाम!

काय आहे संपुर्ण प्रकरण?

६ जानेवारी २०२१ मध्ये राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा पराभव झाला. डेमोक्रॅटिक पक्षाच्या जो बायडन यांनी ट्रम्प यांना तब्बल ७० लाखांहून अधिक इलेट्रोल मतांनी हरवलं. मात्र, निवडणुकीत घोटाळा झाला, असं म्हणत ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

याविरोधात त्यांनी अमेरिकेतील कोर्टात धाव घेतली. पण, कोर्टानेही ही निवडणूक योग्य असून जो बायडन विजेते असल्याचं सांगितलं होतं. एवढं होऊनही ट्रम्प यांनी पराभव मान्य केला नाही. त्यानंतरही ते ट्विटरवरुन सतत आपली मतं मांडत राहिले.

यानंतर ट्रम्प समर्थक आक्रमक होत अमेरिकेच्या कॅपिटल भवनाबाहेर गर्दी करत घोषणाबाजी केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. यावेळी झालेल्या हिंसाचारात ४ ते ५ जणांचा मृत्यू झाला. तर याशिवाय अनेकजण जखमी झाले होते.

दरम्यान,आंदोलकांना चिथावणी देण्याचा ठपका ठेवत ट्रंप यांच्यावर महाभियोगाचा खटला दाखल करण्यात आला होता. मात्र, ट्रम्प यांच्या विरोधात दोन तृतीयांश मते न पडल्याने त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. आता कोलोरॅडो हायकोर्टाने याप्रकरणात त्यांना दोषी मानत निवडणूक लढवण्यावर बंदी घातली आहे.

Donald Trump
कतारमधील भारताच्या माजी नौदल अधिकाऱ्यांना मोठा दिलासा! भारत सरकारच्या प्रयत्नांना यश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.