Donald Trump: ट्रम्प बॉक्सर अन् टी-शर्टवर आले, निरोध देखील वापरला नाही; पॉर्न स्टारने केले अनेक खुलासे

Donald Trump and Porn Star Stormy Daniels Relations: २०१६ मध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि पॉर्न स्टार स्टॉर्मी यांच्यामध्ये लैंगिक संबंध असल्याचं समोर आलं होतं.
Donald Trump stormy daniels
Donald Trump stormy danielsEsakal
Updated on

वॉशिंग्टन- पॉर्न स्टार स्टॉर्मी डेनियल्स आणि अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या संबंधाप्रकरणी अमेरिकेत अद्यापही चर्चा सुरुच आहे. २०१६ मध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि पॉर्न स्टार स्टॉर्मी यांच्यामध्ये लैंगिक संबंध असल्याचं समोर आलं होतं. दाव्यानुसार, ट्रम्प यांनी हे संबंध लपवण्यासाठी स्टॉर्मी यांना एक लाख ३० हजार डॉलर इतके पैसे दिले होते. याप्रकरणी स्टार्मी यांनी कोर्टामध्ये जबाब नोंदवला आहे.

मंगळवारी कोर्टात ट्रम्प यांच्याप्रकरणी सुनावणी झाली. यावेळी स्टॉर्मी यांनी लैंगिक संबंध आणि त्या बदल्यात पैसे घेतल्याप्रकरणी सविस्तर खुलासा केला आहे. स्टॉर्मी यांनी ट्रम्प यांच्यासोबत घालवलेल्या एका रात्रीबाबत सांगितलं आहे. दुसरीकडे, ट्रम्प यांनी स्टॉर्मी यांच्यासोबत कोणतेही संबंध नसल्याचा दावा केला आहे.

Donald Trump stormy daniels
Donald Trump: ट्रम्प यांच्याविरोधात गैरव्यवहाराचा खटला, एकाने कोर्टाबाहेरच स्वत:ला घेतलं पेटवून, धक्कादायक व्हिडिओ

स्टॉर्मी यांनी सांगितलं की, ट्रम्प एका रात्री त्यांच्याकडे आले होते. यावेळी त्यांचा अंगरक्षक देखील तेथे होतो. ट्रम्प यांनी मला पॉर्न इंडस्ट्रीबाबत विचारलं. शिवाय मला टेस्ट केली आहे का असंही विचारलं. ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया यांच्याबाबतही सविस्तर चर्चा झाली. ट्रम्प यांनी सांगितलं होतं की, ते आणि त्यांची पत्नी वेगवेगळ्या खोलीमध्ये झोपतात.

ट्रम्प कपडे बदलून बॉक्सर आणि टी शर्टमध्ये बेडवर आले. मला त्यावेळी ट्रम्प यांच्याबाबत भीती वाटली नाही. ते शांत होते. ट्रम्प यांनी कंडोम देखील वापरला नाही. लैंगिक संबंध ठेवल्यानंतर ट्रम्प पुन्हा भेटण्याचे आश्वासन देऊन निघून गेले. २०११ मध्ये त्यांची शेवटची भेट झाली होती. २००७ मध्ये लॉस एंजिल्समधील एका भेटीदरम्यान ट्रम्प यांनी पुन्हा एकदा सेक्सची मागणी केली होती. पण, मी मासिकपाळीचे कारण देऊन त्यांना टाळलं, असं स्टॉर्मी म्हणाल्या आहेत.

Donald Trump stormy daniels
Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांचा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत समावेश; किती आहे संपत्ती?

डोनाल्ड ट्रम्प आणि स्टॉर्मी डेनियल्स यांच्यामधील या संबंधाची अमेरिकेमध्ये मोठी चर्चा झाली होती. पण, ट्रम्प यांनी या सर्व अफवा असल्याचं म्हणत दावा फेटाळला आहे. दरम्यान, नोव्हेंबर महिन्यामध्ये अमेरिकेमध्ये अध्यक्षीय निवडणुका होणार आहेत. डेमोक्रेटिकचे जो बायडेन आणि रिपब्लिकचे डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये ही थेट लढत होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.