Donald Trump Defamation Case: निवडणुकीपूर्वीच ट्रम्प यांना मोठा झटका! मानहानीच्या खटल्यात लेखिकेला ६९२ कोटी रुपये देण्याचे आदेश

ट्रम्प हे याच वर्षी होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उमेदवार आहेत.
donald trump
donald trumpesakal
Updated on

Donald Trump defamation case: लैंगिक शोषण आणि अब्रुनुकसानीच्या एका प्रकरणात शुक्रवारी मॅनहॅटन कोर्टानं अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात निकाल दिला आहे. ट्रम्प हे याच वर्षी होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उमेदवार आहेत.

कोर्टाच्या आदेशानुसार ट्रम्प यांना लेखिका ई. जीन कॅरोल यांना अब्रुनुकसानीबद्दल ८३.३ मिलियन डॉलर (६९२ कोटी) रुपये द्यावे लागणार आहेत. (donald trump defamation case big blow to him before general election ordered to pay Rs 692 crore to author)

donald trump
Gunaratna Sadavarte: मराठा आरक्षणाच्या नोटिफिकेशनविरोधात गुणरत्न सदावर्ते जाणार हायकोर्टात; 'या' गोष्टींचा करणार उहापोह

कॅरोल यांच्यावतीनं अब्रुनुकसानीबद्दल १० मिलियन डॉलर इतका दावा ठोकण्यात आला होता. पण कोर्टानं त्यापेक्षा कितीतरी पट अधिक ८३.३ मिलियन डॉलरची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयावर प्रतिक्रिया देताना हा हास्यास्पद निर्णय असल्याचं सांगत याविरोधात आपण वरच्या कोर्टात अपिल करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

donald trump
Manoj Jarange: आंदोलन संपलं आता पुढे काय? जरांगेंनी स्पष्ट केली पुढची दिशा

'या' कारणांसाठी द्यावी लागणार भरपाई

कोर्टानं आपल्या आदेशात ६५ मिलियन डॉलरचा दंड ठोठावला आहे. यामध्ये ७.३ मिलियन डॉलर प्रतिपूरक दंड, ११ मिलियन डॉलर रेप्युटेशनल रिपेअरसाठी दंड ठोठावला आहे, असं एकूण ८३.३ मिलियन डॉलरचा दंड ठोठावला आहे. पण ७७ वर्षीय ट्रम्प यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

donald trump
Chhagan Bhujbal: छगन भुजबळांनी बोलावली बैठक! सर्वपक्षीय, संघटनांच्या दलित-ओबीसी नेत्यांना केलं आवाहन

कोर्टातून बाहेर गेल्यानं ट्रम्प यांना पाठवली नोटीस

या खटल्यावेळी खचाखच भरलेलं कोर्ट पाहण्यासाटी ट्रम्प एक क्षण थांबले त्यानंतर त्यांच्यामागे गुप्तचर विभागाचे सदस्य गेले. सुनावणी सुरु असताना अचानक ट्रम्प उठून बाहेर गेल्यानं न्यायाधीश लुईस ए कपलान यांना सुनावणीच्यामध्येच अडथळा आणल्यानं तसा शेरा मारावा लागला. त्यांनी म्हटलं की, सुनावणीदरम्यान ट्रम्प कोर्टातून उठून बाहेर निघून गेले याचा उल्लेख रेकॉर्डमध्ये केला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.