Donald Trump: "48 वर्षांपूर्वी त्यांनी जगन्नाथ रथ..." ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यानंतर इस्कॉनच्या उपाध्यक्षांची पोस्ट व्हायरल

ISCON: इस्कॉनचे उपाध्यक्ष आणि प्रवक्ते राधारमण दास यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. ज्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी 48 वर्षांपूर्वी जगन्नाथ रथ यात्रेस कशी मदत केली हे सांगितले आहे.
Donald Trump Radharamn Das ISCON
Donald Trump Radharamn Das ISCONEsakal
Updated on

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर रविवारी एका रॅलीत जीवघेणा हल्ला झाला. ट्रम्प पेनसिल्व्हेनियामध्ये एका सभेला संबोधित करत असताना हल्लेखोराने त्यांच्यावर अनेक राऊंड गोळीबार केला. या गोळीबारात माजी राष्ट्रपती जखमी झाले आहेत. इंटरनेटवर समोर आलेल्या या घटनेच्या व्हिडिओमध्ये त्याच्या एका कानातून रक्त वाहत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

दरम्यान या पार्श्वभूमिवर इस्कॉनचे उपाध्यक्ष आणि प्रवक्ते राधारमण दास यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. ज्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी 48 वर्षांपूर्वी जगन्नाथ रथ यात्रेस कशी मदत केली हे सांगितले आहे.

इस्कॉनचे उपाध्यक्ष काय म्हणाले?

आपल्या पोस्टच्या सुरुवातीला राधारमण दास म्हणतात, "बरोबर 48 वर्षांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी जगन्नाथ रथयात्रा उत्सव वाचवला होता. आज जगन्नाथ रथयात्रा उत्सव पुन्हा जगभर साजरा करत असतानाच ट्रम्प यांच्यावर हल्ला झाला आणि जगन्नाथ यांनी त्यांना वाचवून परतफेड केली. जुलै 1976 मध्ये, डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्कॉनच्या भक्तांना रथांच्या निर्मितीसाठी त्यांचे ट्रेन यार्ड मोफत देऊन रथयात्रा आयोजित करण्यात मदत केली. आज, जग 9 दिवसांचा जगन्नाथ रथयात्रा उत्सव साजरा करत असताना, त्याच्यावर झालेला हा भयंकर हल्ला आणि यातून त्यांचे वाचणे यामध्ये जगन्नाथाचा हस्तक्षेप दिसतो."

Donald Trump Radharamn Das ISCON
Donald Trump Shooting: डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला करणारे 2 शुटर्स ठार, चकमकीचा Video आला समोर

अमेरिकेत पहिल्यांदा जगन्नाथ रथ यात्रा

युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका मधील तत्कालीन 30 वर्षीय उदयोन्मुख रिअल-इस्टेट उद्योजक डोनाल्ड ट्रम्प यांच्या मदतीने 1976 मध्ये महाप्रभू जगन्नाथ यांची पहिली रथ यात्रा न्यूयॉर्क शहराच्या रस्त्यावर निघाली.

जवळपास 48 वर्षांपूर्वी, जेव्हा इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा चेतना (इस्कॉन) ने न्यूयॉर्क शहरात पहिली रथयात्रा आयोजित करण्याची योजना आखली होती, तेव्हा अनेक आव्हाने होती.

फिफ्थ अव्हेन्यू येथे यात्रेला परवणगी देणे हे चमत्कारापेक्षा कमी नव्हते, परंतु रथ बांधता येईल अशी एक मोठी रिकामी जागा शोधणे देखील सोपे नव्हते. आयोजकांनी शक्य असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे दरवाजे ठोठावले, परंतु सगळे व्यर्थ ठरले आणि तेव्हाच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कृष्णभक्तांसाठी आशेचा किरण म्हणून उदयास आले.

Donald Trump Radharamn Das ISCON
Donald Trump: ट्रम्प आणि मृत्यूमध्ये फक्त फक्त 2 सेमीचे अंतर... माजी राष्ट्राध्यक्षांच्या रॅलीत नेमकं काय घडलं?

इस्कॉनला 1976 मध्ये 10 वर्षे पूर्ण झाली होती. त्यामुळे न्यूयॉर्क मधील भक्त तेथे पहिल्या मोठ्या रथयात्रेची योजना करत होते. आम्हाला फिफ्थ ॲव्हेन्यू वापरण्याची परवानगी होती, जी खरं तर खूप मोठी गोष्ट आहे. पण मोठ्या लाकडी रथ बांधण्यासाठी आम्हाला परेड मार्गाच्या सुरुवातीच्या ठिकाणाजवळ एक रिकामी जागा हवी होती. आम्ही विचारलेल्यापैकी प्रत्येकजण नाही म्हणाला.

पण या कठीण काळात ट्रम्प यांनी रथ बांधण्यासाठी त्यांची मोकळी जागा दिली आणि अमेरिरकेत पहिल्यांदा जगन्नाथ रथ यात्रा निधाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.