US Election Result 2024: गेले जवळपास वर्षभर सुरु असलेल्या अमेरिकी निवडणुकीत बाजी मारत डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अध्यक्ष होण्या सज्ज झाले आहेत. ट्रम्प यांची ही कारकिर्द भारतासाठी फलदायी ठरेल का, अशी उत्सुकता निर्माण झाली आहे..निवडणूक प्रचारामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी सातत्याने 'अमेरिका फर्स्ट'च्या धोरणाचा उल्लेख केला होता. यामुळे ट्रम्प प्रशासन हेच धोरण अधिक प्रभावीपणे राबवण्याचा प्रयत्न करणार, हे उघड आहे. ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या पहिल्या पर्वामध्ये त्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध अनेक प्रसंगांत दिसून आले होते. ट्रम्प-मोदी यांच्या सौहार्दपूर्ण संबंधांमुळे भारत-अमेरिकेच्या संबंधांवरही सकारात्मक परिणाम झाला होता.भारतासमोर असेल आव्हानअमेरिकेसाठी भारत हा अत्यंत महत्त्वाचा देश आहे. ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या कालावधीमध्ये भारतासाठी चांगल्या संधीही उपलब्ध होतील, मात्र काही आव्हानेही पार करावी लागणार आहेत. व्यापार, स्थलांतर, लष्करी सहयोग आणि परराष्ट्र धोरणांच्या विषयात भारतासमोर काही कठीण प्रश्न उपस्थित होऊ शकतात..व्यापाराचं काय?डोनाल्ड ट्रम्प यांनी सातत्याने 'अमेरिका फर्स्ट'च्या धोरणाच्या अंमलबजावणीचे प्रयत्न केले. त्यांच्या पहिल्या कारकिर्दीमध्ये ट्रम्प यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणांमध्ये याच अनुषंगाने अनेक बदल घडवून आणले होते. यात पॅरिस पर्यावरण सहकार्य परिषद व इराण अणुकार्यक्रमासंदर्भातील धोरणांचाही समावेश होता. अध्यक्षपदाच्या दुसऱ्या कारकिर्दीतही ट्रम्प हेच धोरण जोमाने राबवतील, अशीच चिन्हे प्रचारादरम्यान दिसली आहेत. यामुळे अमेरिकेच्या सर्व सहयोगी देशांशी असलेल्या व्यापारविषयक धोरणांत मोठे बदल होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम भारतावरही निश्चित होऊ शकतो..भारतीयांच्या स्थलांतराचं काय?भारतीयांसाठी H-1B व्हिसा हा महत्त्वाचा विषय आहे. यासंदर्भात ट्रम्प यांचे धोरण भारतासाठी पूरक नाही. यामुळे ट्रम्प यांच्या पहिल्या कारकिर्दीतही H-1B व्हिसा मिळवू इच्छिणाऱ्या भारतीयांवर मोठा परिणाम झाला होता. ट्रम्प यांनी त्यावेळी परदेशी कुशल कामगारांसाठीच्या निकषांमध्ये बदल केले होते. याचा सर्वाधिक फटका भारतीयांना बसला होता..India-China Conflict : पूर्व लडाखमधील सैन्यमाघारीची प्रक्रिया पूर्ण! चीनचेही एक पाऊल मागे; दिवाळीनिमित्त सैनिक देणार परस्परांना मिठाई.परराष्ट्र धोरणाचं काय?ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या पहिल्या कारकिर्दीमध्ये त्यांनी चीनला एकटे पाडण्याचा प्रयत्न केला होता. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून अमेरिका, भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांची एक आघाडी निर्माण झाली होती. अध्यक्षपदाच्या दुसऱ्या कारकिर्दीतही ट्रम्प हेच धोरण जोमाने राबवण्याची शक्यता आहे..पुन्हा trump सरकार! कमला हॅरिस यांचा पराभव करत पुन्हा बनणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, बहुमताचा आकडा केला पार.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.