वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी निवड झालेले डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या भावी मंत्रिमंडळाची बांधणी सुरू केली आहे. त्यांनी आज फ्लोरिडाचे सिनेटर मार्को रुबियो यांची परराष्ट्र मंत्रिपदासाठी निवड केली आहे. तसेच, काँग्रेसचे सदस्य असलेल्या माइक वॉल्ट्झ यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून निवड केली आहे.