डोनाल्ड ट्रम्पना तिहेरी धक्का; ट्विटर, फेसबुकसह इन्स्टाग्रामने केली 'ही' कारवाई

donald trump
donald trump
Updated on

वॉशिंग्टन, ता. ६ (वृत्तसंस्था): अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा जॉर्ज फ्लॉईडला आदरांजली अर्पण करणारा व सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा व्हिडिओ ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्राम या तिन्ही कंपन्यांनी हटविला आहे. कॉपीराईटचा भंग झाल्याच्या तक्रारी आल्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले. यामुळे ट्रम्प आणि सोशल मीडिया कंपन्यांमधील वाद आणखी चिघळला. विशेष म्हणजे ट्रम्प यांच्या अध्यक्षीय उमेदवारीच्या प्रचाराची सूत्रे चालविणाऱ्या पथकाने हा व्हिडिओ पोस्ट केला होता. 

पोलिसांनी बळाचा अतिरेकी वापर केल्यामुळे कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉईड याचा मृत्यू झाला. त्यानंतर अमेरिकेत जोरदार आंदोलन होत आहे. या व्हिडिओत आंदोलनाची छायाचित्रे, दृश्य संकलित करण्यात आली. त्याचबरोबर हिंसाचाराचीही उदाहरणे दाखविण्यात आली. ट्रम्प यांचा पार्श्वसंवाद असलेला व्हिडिओ पोस्ट होताच कॉपीराईटचा भंग झाल्याच्या असंख्य तक्रारी आल्या. डिजीटल मिलेनियम कॉपीराईट या कायद्याचा भंग झाल्यामुळे हा व्हिडिओ दिसणार नाही अशी तांत्रिक कार्यवाही करण्यात आली. वास्तविक ट्रम्प यांनी यांदर्भात वेळोवेळी जाहीर भाष्य केले आहे, पण यावेळी ते कॉपीराईटच्या बाबतीत बाद ठरले. 

भारताशी पंगा घेणं चीनला पडणार महागात; आता ड्रॅगनचं काही खरं नाही!

ट्वीटरच्या प्रतिनिधीने सांगितले की, कॉपीराईट धारक किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींनी तक्रार केल्यानंतर आम्ही आम्ही वैध प्रकारांची दखल घेतो. इन्स्टाग्रामची मालकी असलेल्या फेसबुकच्या प्रतिनिधीने सांगितले की, व्हिडिओ तयार करणाऱ्याकडून तक्रार आल्याने आम्ही हा निर्णय घेतला. इन्स्टाग्रामवर मुळ निर्मिती पोस्ट करणाऱ्या संस्थांकडे त्याचे हक्क असणे अपेक्षित असते. 

ट्रम्प यांच्या प्रचार पथकाने सामाजिक ऐक्याचा संदेश देत तीन मिनिटे ४५ सेकंदांचा व्हिडिओ पोस्ट केला. आणखी न्याय्य समाजाच्या दिशेने आपण सक्रीय आहोत, पण आपल्याला तुटून पडायचे नसून सामाजिक बांधणी करायची आहे. मुठी आवळून प्रहार करण्याऐवजी आपण हातात हात घेऊन एकमेकांना साथ देऊ. शत्रुत्वाला शरण न जाता आपण एकतेला पाठिंबा देऊ, असे शब्दांकन करण्यात आले होते. ट्रम्प यांच्या युट्यूब चॅनेलवरही हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता. तेथे व फेसबुक मिळून त्यास १.४ दशलक्ष व्ह्यूज मिळाले होते. 

फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी सुरुवातीला ट्रम्प यांना योग्य वाटेल ते किंवा आवडेल ते पोस्ट करावे अशी भूमिका घेतली होती. मात्र, जेव्हा ट्रम्प यांनी आंदोलकांविरुद्ध लष्करी बळाचा वापर करण्याचे संकेत देणारे ट्विट केले तेव्हा फेसबुकचे अनेक कर्मचारी कामावरून निघून गेले. अनेकांनी यावर आक्षेपही नोंदवला. त्यामुळे अखेर झुकेरबर्ग यांना धोरणाचा फेरविचार करू असे जाहीर करावे लागले. 

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी जहाल डाव्या विचारसरणीच्या डेमोक्रॅटीक पक्षासाठी ट्विटरचा जोरदार संघर्ष सुरु आहे असे म्हणत ही लढाई एकतर्फी आणि बेकायदेशीर आहे, असे ट्विट करीत ट्रम्प यांनी प्रत्यूत्तर दिले. फ्लॉईडच्या मृत्युनंतर अमेरिकेत आंदोलन उसळलं आहे. अनेक ठिकाणी मॉल्समध्ये लुटालूट करण्यात आली. याबाबत ट्रम्प यांनी ट्विट केले होते की, कोणतीही समस्या निर्माण झाली तर आम्ही नियंत्रण मिळवू, पण जेव्हा लुटालूट सुरु होईल, तेव्हा गोळीबार सुरु होईल. त्यानंतर ट्विटरने यावर हिंसाचाराचे उदात्तीकरण करणारं ट्विट असं मेन्शन केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.