Politics: ट्रम्प-हॅरिस वादात नवा ट्विस्ट! अध्यक्षीय निवडणुकीसाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी मागितली हिंदू नेत्याची मदत

America Presidential Election: डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्यासोबत निवडणुकीची चर्चा करण्याची तयारी केली आहे. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी माजी डेमोक्रॅटिक काँग्रेस सदस्य आणि हिंदू-अमेरिकन नेते तुलसी गबार्ड यांची निवडणूक चर्चेत कमला हॅरिस यांचा पराभव करण्यासाठी मदत मागितली आहे.
Donald Trump
Donald TrumpESakal
Updated on

अमेरिका: अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस मतदारांना आपल्या बाजूने आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता सर्वांचे लक्ष 10 सप्टेंबर रोजी होणाऱ्या चर्चेकडे लागले आहे. ज्यामध्ये पहिल्यांदाच डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यात लढत होणार असून दोघेही विविध मुद्द्यांवर आपली मते मांडणार आहेत. यातच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी कमला हॅरिस यांना हरवण्यासाठी एका भारतीयाची मदत मागितली आहे. यामुळए राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.