Donald Trump Third Attack: ट्रम्प यांच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला? अॅरिझोना इथल्या निवडणूक रॅलीत नेमकं काय घडलं?

ट्रम्प यांच्यावर काही दिवसांपूर्वीच गोळीबाराची घटना घडली होती. यामध्ये बंदुकीतून सुटलेली गोळी ट्रम्प यांच्या कानाला चाटून जखम करुन गेली होती.
Donald Trump
Donald Trumpsakal
Updated on

वॉशिंग्टन : ट्रम्प यांच्यावर काही दिवसांपूर्वीच गोळीबाराची घटना घडली होती. यामध्ये बंदुकीतून सुटलेली गोळी ट्रम्प यांच्या कानाला चाटून जखम करुन गेली होती. यातून ते थोडक्यात वाचले होते, यानंतर आता पुन्हा एकदा तिसऱ्यांदा ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची चर्चा आहे. अरिझोना इथल्या टक्सन इथं हा प्रकार घडला आहे.

Donald Trump
Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर दुसऱ्यांदा जीवघेणा हल्ला; थोडक्यात बचावले, नेमकं काय घडलं?

रॅलीत ट्रम्प यांच्यासोबत नेमकं काय घडलं?

टक्सन इथं निवडणूक सभा सुरु असताना अचानक डोनाल्ड ट्रम्प यांच्या डोळ्याला जखम झाली यानंतर त्यांच्या डोळ्यावर सूजही आली. त्यानंतर त्यांना भोवळही आली, असं स्थानिक माध्यमांनी आपल्या वृत्तात म्हटलं आहे. पण या घटनेनंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाल्या. यामध्ये अनेक युजर्सनं ट्रम्प यांच्यावर झालेला हा हल्ला म्हणजे तिसऱ्यांदा हत्येचा प्रयत्न असल्याचं म्हटलं आहे. पण अद्याप अधिकृतरित्या असा हत्येचा काही प्रकार घडला आहे की नाही हे स्पष्ट करण्यात आलेलं नाही.

Donald Trump
Kamala Harris vs. Donald Trump : तुमच्यासमोर मी आहे,बायडेन नाही : हॅरिस यांनी ट्रम्प यांना ठणकावले; खुल्या चर्चेत आक्रमक युक्तिवाद

हॅरिस यांच्यासोबत पहिलीच डिबेट

याठिकाणी विरोधी उमेदवार कमला हॅऱिस यांच्यासोबत ट्रम्प यांची ही पहिलीच डिबेट होती. या डिबेटसाठी हजारो लोकांनी हजेरी लावली होती. यांपैकी काहीजण ट्रम्प यांच्यासोबत स्टेजवर उपस्थित होते. हे लोक ट्रम्प यांच्या 'लिटॅनस फॉर ट्रम्प' या ग्रुपचे प्राथमिक सदस्य आहेत. या दुर्घटनेनंतर ट्रम्प यांच्या समर्थकांनी त्यांना तातडीनं इमर्जन्सी रुममध्ये नेलं आणि प्रथोमपचार केले.

Donald Trump
Donald Trump-Elon Musk: ट्रम्प यांची मोठी घोषणा! सत्तेत आल्यास इलॉन मस्क यांना सरकारमध्ये जबाबदारी

स्टेजवरील लोकांनाही झाला त्रास

विशेष म्हणजे ट्रम्प यांच्यासोबत जे २० लोक स्टेजवर उपस्थित होते त्यांना देखील अचानक अंधुक दिसणं, डोळ्यांवर सूज आणि केमिकल सारख्या ज्वलनशील पदार्थाची जखम झाल्याचा त्रास जाणवू लागला. त्यामुळं हा नक्कीच केमिकल हल्ल्याचा प्रकार असणार असं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे.

Donald Trump
Donald Trump Assassination Plan: डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यामागे इराण? पाकिस्तानी आरोपी अमेरिकन गुप्तहेराच्या जाळ्यात

ट्रम्प यांच्यावर झाला होता गोळीबार

दरम्यान, यापूर्वी १३ जुलै रोजी पेन्साल्व्हियातील रॅलीमध्ये थॉमस मॅथ्यू क्रूक्स या तरुणानं ट्रम्प यांच्यावर गोळीबार केला होता. भाषणादरम्यान झालेल्या या गोळीबारात ट्रम्प हे लोकांशी बोलत असताना डोक वळवल्यानं गोळी त्यांच्या उजव्या कानाला चाटून गेली. यामुळं त्यांच्या कानाला जखम झाली आणि रक्तही आलं. जर ट्रम्प यांनी जराही डोकं उजवीकडं वळवलं असतं तर गोळी थेट त्यांच्या डोक्यात घुसली असती, असं नंतर तपासातून समोर आलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.