Donald Trump: पुन्हा अध्यक्षपदी निवड झाल्यास इस्रायलचा प्रश्न चुटकीशीर सोडवणार; ट्रम्प यांचं आश्वासन

ट्रम्प यांचा मंगळवारी आयोवा कोकाससमध्ये ट्रम्प यांचा विजय झाला आहे.
Donald Trump
Donald Trumpesakal
Updated on

वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा दुसऱ्या टर्मसाठी प्रयत्नशील आहेत यासाठी त्यांनी यावेळी चांगलाच जोर लावला आहे. या आपल्या प्रचारादरम्यान, त्यांनी नवी भूमिका मांडली आहे. जर मी अद्यापही अमेरिकेचा अध्यक्ष असतो तर इस्रायलवर हमासकडून हल्लाच झाला नसता असं त्यांनी म्हटलं आहे.

तसेच जर पुन्हा आपण निवडून आलो तर हा प्रश्न चुटकीसरशी सोडवू असंही त्यांनी म्हटलं आहे. 'दि टाइम्स ऑफ इस्रायल' या वर्तमानपत्राशी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. (Donald Trump vows to solve horrible Israeli situation very soon if re elected)

सीएनएनच्या वृत्तानुसार, ट्रम्प यांचा मंगळवारी आयोवा कोकाससमध्ये ट्रम्प यांचा विजय झाला आहे. यामुळं आगामी २०२४ मधील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाच्या नामांकनासाठी ट्रम्प यांचं स्थान मजबूत झालं आहे. (Latest Marathi News)

२०१४ मध्ये हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले होते. त्यानंतर परत दुसऱ्या टर्मसाठी त्यांना रिपब्लिकन पार्टीनं उमेदवारी दिली होती. पण जो बायडन यांच्याविरोधात त्यांचा पराभव झाला होता. पण आता पुन्हा एकदा ते निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. म्हणजेच सलग तिसऱ्या वेळेस ट्रम्प निवडणूक लढवण्यास सज्ज आहेत.

Donald Trump
Sadavarte Vs Jarange: जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात सदावर्तेंची हायकोर्टात याचिका; 'या' दिवशी होणार सुनावणी

कोकाससमध्ये विजयानंतर ट्रम्प यांनी बायडन यांच्यावर टीका केली आहे. बायडन हे अमेरिकेच्या इतिहासात आत्तापर्यंतचे सर्वात खराब अध्यक्ष आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे. जर आपण अजूनही अध्यक्ष असतो तर रशिया युक्रेनवर कधीही हल्ला करु शकला नसता तसेच इस्रायलवर कधीही हल्ला झाला नसता. पण जर आपल्याला नोव्हेंबरमध्ये पुन्हा संधी मिळाली तर इस्रायलचा प्रश्न चुटकीशीर सोडवू असं आश्वासनही त्यांनी दिलं. (Marathi Tajya Batmya)

Donald Trump
IndiGo Mumbai airport: रनवेवर बसून प्रवाशांनी केलं जेवण; इंडिगो आणि मुंबई विमानतळाला मंत्रालयाची नोटीस, दिला गंभीर इशारा

युक्रेनची परिस्थिती भयंकर बनली आहे. तसेच इस्रायलची स्थिती देखील तशीच भयंकर आहे. पण आम्ही हा प्रश्न सोडवणार आहोत. आम्ही लवकरच हा प्रश्न सोडवू असंही त्यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.