NATO देशांवर एक इंचसुद्धा येण्याचा विचारही करु नका; रशियाला अमेरिकेचा इशारा

रशियन लोक आमचे शत्रू नाहीत,असेही जो बायडन म्हणाले
Joe Biden
Joe Bidenसकाळ डिजिटल टीम
Updated on

रशिया युक्रेन युद्धावर साऱ्या जगाच्या चिंता वाढल्या आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध आता दोन देशांपुरते मर्यादित राहले नसून तो आता जागतिक विषय बनलाय. रशियाने युक्रेनवरील हल्ल्याचा अमेरिकेसह अनेक देश विरोध करत आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी वारंवार रशियाला इशारा दिला आहे. मध्यंतरी अमेरिकेने रशियावर काही निर्बंध लादले.यातच जो बायडन यांनी रशियाला नाटोच्या कोणत्याही प्रदेशावर एक इंचसुध्दा जाण्याचा विचारही करू नका,असा स्पष्ट इशारा दिलाय

Joe Biden
पाकिस्तानात होणार राजकीय उलथापालथ? इम्रान खान उद्या राजीनामा देण्याची शक्यता

जो बायडेन म्हणाले, “आधीच हे युद्ध रशियासाठी धोरणात्मक अपयशी ठरले आहे.मात्र पुतीन हे सत्तेवर राहू शकत नाही.” रशियन लोक आमचे शत्रू नाहीत,असेही जो बायडेन म्हणाले. तर नाटोच्या कोणत्याही प्रदेशावर एक इंचसुध्दा येण्याचा विचारही करू नका,असा स्पष्ट इशारा दिलाय

Joe Biden
रशियाकडून आण्विक पाणबुड्या सज्ज; व्लादिमीर पुतीन

रशिया- युक्रेन युद्धाचा ३१ वा दिवस असून शस्त्रबंदी होण्याची कोणतीही शक्यता दिसत नसतानाच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी त्यांच्या आण्विक पाणबुड्या उत्तर अटलांटिक महासागरात रवाना केल्या आहेत. या महासागराजवळ युरोपीय समुदायातील अनेक देश आहेत. युक्रेनचे समर्थन करणाऱ्या पाश्‍चिमात्य देशांना त्याचे परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रशियाने आण्विक पाणबुड्या उत्तर अटलांटिक महासागरात पाठविल्या आहेत. त्यामुळे युद्ध आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.