फ्लेरियू द्वीपकल्पातील समुद्रकिनाऱ्यांवर सुमारे 20 पेंग्विनांचे मृतदेह आढळून आले आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या (Australia) समुद्रकिनाऱ्यांवर एक आश्चर्यकारक दृश्य पाहायला मिळालंय. इथं डझनभर पेंग्विनांचा (Penguin) शिरच्छेद करण्यात आलाय. पेंग्विनांची ही अवस्था पाहून शास्त्रज्ञही अस्वस्थ झाले आहेत. एवढ्या पेंग्विनांचा शिरच्छेद करण्यामागं नेमकं कारण काय, याचा तपास सुरूय.
एप्रिल महिन्यात दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या (South Australia) फ्लेरियू द्वीपकल्पातील (Fleurieu Peninsula) समुद्रकिनाऱ्यांवर सुमारे 20 पेंग्विनांचे मृतदेह आढळून आले. हा आकडा 2021 मध्ये या भागात पेंग्विनांच्या मृत्यूच्या संख्येपेक्षा जास्त आहे. दक्षिण ऑस्ट्रेलियामध्ये स्टीफन हेजेस (Stephen Hedges) या मृत पेंग्विनांचं शव गोळा करत आहेत, 'जेणेकरून त्यांचा अभ्यास करता येईल. त्यांचं मुंडकं का कापलं गेलं, हे शोधून काढता येईल. यामागं नेमकं कारण काय? याचाही शोध घेता येईल.'
पेंग्विनांचे केवळ मृतदेहच नाही, तर त्यांची छिन्नविछिन्न मुंडकीही समुद्राच्या किनाऱ्यावर सापडत आहेत. समुद्रात हे मृत्यू होत असल्याने या प्रकरणात मानवी हात असण्याची शक्यता नाकारता येत नाहीय. मात्र, या भागात मोठ्या प्रमाणात जहाजे असण्याची शक्यता स्टीफन हेजेस यांनी व्यक्त केलीय. मासेमारी बोटीचे पंखे (Propellers) मृत्यूचं कारण असू शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे. ते म्हणाले, आम्हाला दर महिन्याला समुद्रकिनाऱ्यांवर एक किंवा दोन मृत पेंग्विन आढळतात, परंतु केवळ एप्रिलमध्ये आम्हाला 15 ते 20 मृतदेह सापडले आहेत. कधी-कधी एका दिवसांत तीन मृतदेहही सापडले आहेत. पेंग्विनांची मुंडकी एकाच वेळी धडावेगळी केल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केलाय.
स्टीफन हेजेस यांनी सांगितलं की, नुकतीच एन्काउंटर बे (Encounter Bay) जवळ मासेमारी स्पर्धा झाली होती, त्यामुळं बोटींच्या आसपास पेंग्विन आकर्षित झाले असावेत. याशिवाय पेंग्विनच्या हत्येमागं पर्यटन हेही कारण असू शकतं. कारण, ईस्टर आणि वीकेंड्समुळं या भागात भरपूर पर्यटक आले होते. अनेक पर्यटक आपल्या कुत्र्यांसह समुद्र किनाऱ्यावर फिरत होते. याशिवाय, हे काम कोल्ह्याकडूनही केलं जाऊ शकतं. मात्र, खरं कारण शोधण्यासाठी शास्त्रज्ञांना दोन ते तीन आठवडे लागतील, असं त्यांनी स्पष्ट केलंय. गेल्या सप्टेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या किनारपट्टीवर मधमाशांच्या थव्यानं 63 संकटग्रस्त आफ्रिकन पेंग्विन ठार मारलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.