Dubai Temple: दुबईत साकारलं हिंदू मंदिर; भारतीय भक्तांची पहिल्याच दिवशी गर्दी

आजपासून भक्तांना दर्शनासाठी हे मंदिर खुले असणार आहे
Dubai Temple
Dubai Templeesakal
Updated on

Dubai Temple: दुबईमध्ये हिंदू मंदिर साकारल्या गेलं असून दहा वर्षापासून दुबईतील भारतीयांच्या मनातील स्वप्न आता सत्यात उतरलंय. संयुक्त अरब अमिरातचे मिनिस्टर ऑफ टॉलरंस शेख नाहयान बिन मुबारक यांच्या हस्ते या मंदिराचं उद्घाटन करण्यात आलं.

दसऱ्याच्या एक दिवसाआधी या मंदिराचं अधिकृतरित्या उद्घाटन करण्यात आलं. हे भव्य मंदिर जेबेल अलीमधील अमीरातच्या कॉरिडोरमधल्या ऑफ टॉलरंसमध्ये बांधण्यात आलंय. हे मंदिर जवळपास ७०,००० स्केअर फुट क्षेत्रामध्ये आहे. मंदिराच्या उद्घाटनावेळी २०० पेक्षा जास्त गणमान्य पाहुणे हजर होते. या मंदिराची विशेषता सांगायची झाल्यास या मंदिरात चर्च, गुरूद्वारासह अन्य धार्मिक स्थेळेही आहेत.

दुबईतील हे नवं मंदिर सर्वधर्मियांठी एक आध्यात्मिक हब ठरतंय. मंदिरात हिंदू धर्माच्या १६ देवी देवतांच्या मूर्त्यांसह एक ज्ञान कक्ष आणि अन्य धार्मिक क्रियांसाठी एक सामुदायिक केंद्रदेखील आहे. हे नवं मंदिर सकाळी ६.३० ते ८ या वेळात भाविकांसाठी खुले असणार आहे. या मंदिरात एका वेळी हजार ते बाराशे भाविक एकत्र येऊ शकतात.

मंदिरात क्यूआर कोडच्या माध्यमातून अपॉइंटमेंट सिस्टमचा उपयोग करत जवळपास दोन लाख लोकांनी आतापर्यंत मंदिराचा दौरा केलाय. या वर्षाच्या शेवटपर्यंत मंदिराच्या परिसरात विशेष सामुदायिक केंद्र, प्रार्थना आणि हिंदू लग्नसमारंभासारखे कार्यक्रमही करता येतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.