Private Island: नादखुळा नवरा! बायकोला बिकिनी घालता यावी म्हणून खरेदी केलं ४१८ कोटींचं खासगी बेट

Saudi Al Nadak: सौदी अल नादक ही एक गर्भश्रीमंत गृहीणी तर आहेच. याशिवाय ती एक प्रभावशाली व्यक्ती म्हणून स्वतःला प्रेझेंट करते. तिच्या इन्स्टाग्राम आणि टिकटॉक अकाऊंटवर ती सातत्याने पोस्ट करत असते. त्यातून तिची श्रीमंती दिसून येते.
Private Island
Private Islandesakal
Updated on

Dubai News: बायको लाडकी असेल तर कोण काय करेल याचा नेम नाही. दुबईतल्या एका नादखुळ्या नवऱ्याने लाडक्या बायकोला बिकिनी घातला यावी यासाठी चक्क एक खासगी बेट खरेदी केलंय. तेही ४१८ कोटी रुपयांना. त्याच्या बायकोनेच सोशल मीडियात पोस्ट करुन याबाबत माहिती दिली.

२६ वर्षीय सौदी अल नादक या ब्रिटिश महिलेचं लग्न जमाल अल नादक याच्यासोबत तीन वर्षांपूर्वी झालं होतं. सौदी अल नादकने तिच्या इन्स्ट्राग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने एका बीचचा व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ लाखो लोकांनी बघितला असून तिने त्यात त्या बीचची माहिती दिलीय.

ती म्हणते, पती जमाल अल नादकने ५० मिलियन डॉलर खर्चून एक खासगी एशियाई बीच खरेदी केलं आहे. मला बिकिनी घालायची होती, त्यामुळे माझ्या करोडपती नवऱ्याने माझ्यासाठी एक बीच खरेदी केलं. जमालने ही खास गुंतवणूक माझ्यासाठी केली आहे.

सौदी अल नादक ही एक गर्भश्रीमंत गृहीणी तर आहेच. याशिवाय ती एक प्रभावशाली व्यक्ती म्हणून स्वतःला प्रेझेंट करते. तिच्या इन्स्टाग्राम आणि टिकटॉक अकाऊंटवर ती सातत्याने पोस्ट करत असते. त्यातून तिची श्रीमंती दिसून येते.

जमालच्या बायकोचा हा व्हिडीओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल आहे. एका आठवड्यात या व्हिडीओला २.४ मिलियन व्ह्यूज् मिळाले आहेत. तिने व्हिडीओ शेअर केला मात्र ते बेट नेमकं कुठे आहे, याबाबत माहिती दिली नाही. गोपनियतेचा भाग म्हणून तिने या मालमत्तेची माहिती दिली नाही.

''मागच्या काही दिवसांपासून आम्ही मोठ्या गुंतवणुकीबद्दल विचार करत होतो. मला वाटतं की हे बेट स्वीमसूट घालण्यासाठी इच्छूक असलेल्या अरबी महिलांसाठी आवडीचं ठिकाण होईल.'' असं सौदी अल नादक म्हणते.

Private Island
Haji Ali Dargah Bomb Threat: मुंबईतील 'हाजी अली दर्ग्या'ला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! अज्ञात फोनमुळं खळबळ

जमालने आपल्या बायकोवर केलेला खर्च, हे पहिल्यांदा झालेलं नाही. तर यापूर्वीही त्याने बायकोसाठी महागडे गिफ्ट खरेदी केलेले आहेत. ती सातत्याने पतीने केलेले खर्चाबद्दल इन्स्टाग्रामवर माहिती टाकत असेत. एका व्हिडीओत ती सांगते की, माझ्या नवीन गाडीला कस्टमाईज करण्यासाठी जमाल इटलीला गेला आहे. तेव्हा त्याने एक हिऱ्याची अंगठी खरेदी केली, तिची किंमत ८.२२ कोटी रुपये होती. ही जोडी रात्री डिनरला १ लाख रुपये खर्च करते.

''आपण जर सुट्ट्यांमध्ये स्वतःसाठी खर्च करत नसू तर मग काय फायदा? '' असं सौदी म्हणते. बेट खरेदी करण्यापूर्वी ही जोडी आपल्या मालमत्तेचं प्रदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध आहे. सौदीची जमालसोबत पहिली भेट दुबईमध्ये झाली होती. तेव्हा ती शिक्षणासाठी दुबईमध्ये वास्तव्याला होती. त्यांच्या लग्नाला आता तीन वर्षे झाली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.