कोलंबियाच्या तोलिमा विभागात रविवारी (ता.२५) बुलफायटिंगमध्ये मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओत बुलफायटिंगच्या (Bull Fighting) मैदानात उपस्थितांनी मंडप खचाखच भरला होता. तो अचानक कोसळला. यामुळे दोघांचा मृत्यू झाला आणि ६० जण जखमी झाले. स्थानिक प्रसारमाध्यमांनुसार अनेक जखमींना जवळच्या सॅन राफेल दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. कोलंबियाचे (Colombia) नवनिर्वाचित राष्ट्रपती गुस्तावो पेट्रो ( Gustavo Petro) यांनी दुर्घटनेचा व्हिडिओ पुन्हा पोस्ट केला. त्यांनी जखमींबद्दल चिंत व्यक्त करुन म्हणाले, असे कार्यक्रम अधिकृत न करण्यास महापौरांना बोललो आहे. (During Bullfighting Pandal Accidently Collapsed In Colombia, two Died And 60 Injured)
आखाड्यात गोंधळाची स्थिती
बुलफायटिंग मैदानात ज्यावेळी स्टँड कोसळले, त्यावेळी गोंधळाची स्थिती होती. त्यावेळ प्रत्येक जणाची पळापळ सुरु होती. आखाड्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले. ही सर्व घटना लोकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली.
व्हायरल झाला व्हिडिओ
मंडप कोसळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियाचे व्यासपीठ ट्विटवर मायकल ओर्टिड सैझ या खात्यावरुन पोस्ट केला गेला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत ५१ हजारांपेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे. २६ जून रोजी पोस्ट केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत १७४ पेक्षा जास्त वेळा रिट्विट केले गेले आहे आणि २५८ पेक्षा जास्त जणांनी लाईक केले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.