Geert Wilder: भाजपच्या नुपूर शर्माला पाठिंबा देणारे खासदार होणार नेदरलँडचे पंतप्रधान!

कट्टर उजव्या विचारसरणीचे नेते आणि इस्लामविरोधी अशी गिर्ट विल्डर यांची ओळख आहे.
Dutch MP Geert Wilders
Dutch MP Geert WildersSakal
Updated on

नवी दिल्ली : प्रेषितांवर टीका करणाऱ्या आणि वारंवार वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना नेदरलँडचे फायरब्रँड खासदार गिर्ट विल्डर यांनी पाठिंबा दर्शवला होता. गिर्ट विल्डर हे कट्टर उजव्या विचारसरणीचे मानले जातात. हेच विल्डर आता नेदरलँडचे पंतप्रधान होण्यासाठी सज्ज आहेत. कारण इथल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा विजय झाल्याचं वृत्त आहे. (Dutch MP Geert Wilder will become Prime Minister was in news in India for supporting Nupur Sharma)

कट्टर उजव्या विचारसरणीचे नेते

गिर्ट विल्डर हे ज्या पक्षाचे नेते आहेत तो पक्ष पीव्हीव्ही (फ्रिडम पार्टी) हा कट्टर उजव्या विचारसरणीचा आणि इस्लामविरोधी मानला जातो. या पक्षानं नेदरलँडच्या संसदेत ३५ जागा जिंकल्या आहेत. तसेच मतदानोत्तर चाचण्यांमध्ये देखील त्यांचाच पक्ष विजयी होत असल्याचं भाकित वर्तवण्यात आलं आहे. तर डाव्या विचारसरणीची आघाडी २५ जागांवर पिछाडीवर आहे. तसेच मध्य उजवा पक्ष २४ जागांवर आहे. (Latest Marathi News)

Dutch MP Geert Wilders
Kirti Azad: "तुमच्यावेळी तर दाऊद येत होता..."; PM मोदींवर टीका करणाऱ्या किर्ती आझादांवर नेटकरी भडकले

ट्रम्प यांच्याशी तुलना

विल्डर्स यांची तुलना डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी केली जाते. कारण त्यांची केशरचना ट्रम्प यांच्या प्रमाणं स्वीप-बॅक अन् सोनेरी रंगात रंगवलेली आहे. तसेच स्थलांतरित आणि मुस्लिमांना त्यांचा मोठा विरोध आहे. मोरोक्कन लोकांना त्यांनी 'स्कम' असं संबोधलं होतं. तसेच प्रेषित मोहम्मद यांच्या व्यंगचित्रांसाठी स्पर्धा आयोजित केल्यानं त्यांना धमक्या देखील आल्या होत्या. (Marathi Tajya Batmya)

Dutch MP Geert Wilders
Girish Mahajan: खडसेंनी टीका करण्यापेक्षा घ्यावी तब्येतीची काळजी; गिरीश महाजन यांचा टोला

नेक्झिट होणार का?

आपल्या पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यात त्यांनी इस्लामिक शाळा, कुराण आणि मशिदींवर बंदी घालण्यात येईल असं म्हटलं होतं. तसेच सरकारी कार्यालयांमध्ये हिजाब घालण्यास बंदी घालण्यात येईल असं त्यात म्हटलं आहे.

नेदरलँडला युरोपियन युनियनमधून बाहेर पडायचं आहे. यासाठी 'नेक्झिट'वर बंधनकारक सार्वमत घेण्यात येईल, असंही पीव्हीव्हीच्या जाहीरनाम्यात म्हटलं आहे. हंगेरीचे राष्ट्रवादी पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बन यांनी आधीच नेदरलँडला यासाठी पाठिंबा दिला असून त्यांची प्रशंसा देखील केली आहे.

Dutch MP Geert Wilders
Weather Update: राज्यात पुढील 4 ते 5 दिवसात अवकाळी पावसाची शक्यता! मुंबई, रत्नागिरीला यलो अलर्ट, वाचा हवामान विभागाचा अंदाज

हल्ल्याचा आरोप

2021च्या निवडणुकीपूर्वी AFP ला दिलेल्या मुलाखतीत विल्डर्स म्हणाले होते की, मला स्वातंत्र्यासाठी लढल्याबद्दल खेद वाटत नाही, माझ्यावर हल्ला झाला आहे हा माझ्या देशावर झालेला हल्ला आहे.

2016 मध्ये विल्डर यांनी नेदरलँड्समध्ये राहणाऱ्या मोरोक्कन लोकांविरुद्ध केलेल्या टिप्पण्यांबद्दल भेदभाव केल्याचा ठपका ठेवत दोषी ठरवण्यात आलं होतं आणि त्यांनी यापूर्वी कुराणची तुलना अॅडॉल्फ हिटलरच्या 'माईन काम्फ' या आत्मचरित्राशी केली होती. दोन्ही पुस्तकांवर बंदी घातली पाहिजे असं त्यांनी म्हटलं होतं. यावरुन विल्डर यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर 2018 मध्ये प्रेषितांवर व्यंगचित्र स्पर्धेची योजना रद्द करण्यास भाग पाडले गेले.

Dutch MP Geert Wilders
Temple Dress Code : महाराष्ट्रातील 232 मंदिरांमध्ये प्रवेशासाठी ड्रेस कोड नियम लागू; कोकणातील प्रसिद्ध 47 मंदिरांचा समावेश

नुपूर शर्माला दिला होता पाठिंबा

भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी गेल्यावर्षी प्रेषितांवर टीका केली होती. त्यांच्या या विधानावर गिर्ट विल्डर यांनी नुपूर शर्मा यांनी कुठलंही चुकीचं विधान केलेलं नाही, असं म्हटलं होतं. त्यामुळं भारतात ते चर्चेचा विषय राहिले होते. पण यासाठी त्यांना नेदरलँडमध्ये टीकेचं धनी व्हावं लागलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.