चीनच्या गान्सू प्रांतात सोमवारी रात्री उशिरा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.2 इतकी मोजण्यात आली आहे. चायना अर्थक्वेक नेटवर्क सेंटर (CENC) नुसार, सोमवारी रात्री 23:59 वाजता उत्तर-पश्चिम चीनच्या गान्सू प्रांतात जोरदार भूकंप झाला. यापूर्वी पाकिस्तानातही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते.(Latest Marathi News)
चीनच्या गान्सू प्रांतात काल(सोमवारी) रात्री उशिरा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.2 इतकी मोजण्यात आली आहे. चायना अर्थक्वेक नेटवर्क सेंटर (CENC) ने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास उत्तर-पश्चिम चीनच्या गान्सू प्रांतात भूकंप झाला.यापूर्वी पाकिस्तानातही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते.
गान्सूच्या प्रांतीय आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता इतकी होती की, या भागातील अनेक इमारती कोसळल्या आहेत. चीनच्या सरकारी मीडिया रिपोर्टनुसार, गांसू आणि किंघाई प्रांतात 6.2 तीव्रतेच्या भूकंपात किमान 111 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर 230 हून अधिक जखमी झाले आहेत. प्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपामुळे सर्वात जास्त नुकसान काउंटी, डियाओजी आणि किंघाई प्रांतात झाले आहे. येथील अनेक इमारती कोसळल्यामुळे लोक ढिगाऱ्याखाली दबले गेले आहेत, त्यांना बाहेर काढण्यात बचाव पथके प्रयत्न करत आहेत. मृत आणि जखमींची संख्या वाढू शकते.(Latest Marathi News)
CENC ने सांगितले की, भूकंपाचा केंद्रबिंदू 35.7 अंश उत्तर अक्षांश आणि 102.79 अंश पूर्व रेखांशावर 10 किलोमीटर खोलीवर नोंदवला गेला. आपत्कालीन सेवांनी लोकांना मदत करण्यास सुरुवात केली असून स्थानिकांच्या मदतीसाठी बचाव कार्य केले जात आहे.
पाकिस्तानातही ५.८ रिश्टर स्केलचा भूकंप
सोमवारी पाकिस्तानातही ५.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. मात्र, यात कोणतीही हानी किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. नॅशनल सिस्मिक मॉनिटरिंग सेंटर (NSMC) नुसार, भूकंप 133 किमी खोलीवर झाला आणि त्याचा केंद्रबिंदू भारतातील जम्मू आणि काश्मीर होता. राजधानी इस्लामाबादसह इतर शहरांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.
भूकंप का आणि कसे होतात?
वैज्ञानिकदृष्ट्या समजून घेण्यासाठी आपल्याला पृथ्वीची रचना समजून घ्यावी लागेल. पृथ्वी टेक्टोनिक प्लेट्सवर वसलेली आहे. त्याच्या खाली द्रवरूप लावा आहे आणि त्यावर टेक्टोनिक प्लेट्स तरंगत आहेत. अनेक वेळा या प्लेट्स एकमेकांवर आदळतात. वारंवार आदळल्यामुळे, काहीवेळा प्लेट्सचे कोपरे वाकतात आणि जेव्हा जास्त दाब असतो तेव्हा या प्लेट्स तुटू लागतात. अशा स्थितीत खालून येणारी ऊर्जा बाहेर पडण्याचा मार्ग शोधते. जेव्हा यामुळे गोंधळ निर्माण होतो तेव्हा भूकंप होतो.(Latest Marathi News)
तीव्रता कशी मोजली जाते?
भूकंप रिश्टर स्केलवर मोजले जातात. भूकंपाच्या लहरींची तीव्रता मोजण्यासाठी रिश्टर स्केल हे गणितीय स्केल आहे, त्याला रिश्टर मॅग्निट्युड टेस्ट स्केल म्हणतात. रिश्टर स्केलवर, भूकंप 1 ते 9 पर्यंत त्याच्या केंद्रापासून म्हणजे केंद्रापासून मोजले जातात. भूकंपाच्या वेळी पृथ्वीमधून बाहेर पडलेल्या ऊर्जेवर आधारित हे प्रमाण तीव्रतेचे मोजमाप करते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.