इंडोनेशिया भूकंपाने हादरले; त्सुनामीचा इशारा

Tsunami Warning in Indonesia
Tsunami Warning in Indonesiaesakal
Updated on
Summary

इंडोनेशियाला जोरदार भूकंपाचा धक्का बसला आहे.

पूर्व इंडोनेशियाला (Indonesia) मंगळवारी जोरदार भूकंपाचा (Earthquake) धक्का बसला. ७.७ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेच्या भूकंपानं इंडोनेशिया हादरलं असून त्सुनामीचा (Tsunami Warning in Indonesia) इशारा देण्यात आलाय. अमेरिकेच्या जिओलॉजीकल सर्व्हेत सांगण्यात आलंय, की भूकंप फ्लोर्स समुद्रात १८.५ किमी अंतर खोलीवर झाला. पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटरनं (Pacific Tsunami Warning Center) त्सुनामीचा इशारा दिलाय.

भूकंपाचे केंद्र १ हजार किलोमीटरपर्यंत किनाऱ्यावर मोठ्या लाटा उसळण्याची भीती पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटरनं व्यक्त केलीय. समुद्रात त्सुनामीची शक्यता असली तरी त्यामुळं लोकांना फटका बसण्याची शक्यता कमी आहे. नुकत्याच आलेल्या भूकंपामुळं त्सुनामी आणि भूस्खलनाचा धोका निर्माण झाला होता. इंडोनेशियात २००४ मध्ये सर्वात विध्वंसक असा भूकंप झाला होता. सुमात्राजवळ झालेल्या भूकंपाची तीव्रता ९.१ इतकी होती. यात जवळपास दीड लाख नागरिकांचा मृत्यू झाला होता.

Tsunami Warning in Indonesia
चीनला धास्ती! देशात आढळला कोरोनाचा नवा व्हेरिअंट ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण

यंदा मे महिन्यात सुमात्रा बेटाजवळ (Sumatra island) उत्तर किनारपट्टीवर ६.६ तीव्रतेचा भूकंप आला होता. 2004 मध्ये इंडोनेशियामध्ये मोठा भूकंप झाला होता. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 9.1 एवढी होती. यात दक्षिण आशियामध्ये 2.2 लाख लोकांचा मृत्यू, तर एकट्या इंडोनेशियामध्ये 1.7 लाख लोकांचा मृत्यू झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.