नेपाळ भूकंपाने हादरले; 5.8 रिश्टर स्केलचा धक्का

Earthquake
Earthquake
Updated on

काठमांडू - नेपाळला (Nepal) बुधवारी सकाळी भूकंपांचे (Earthquake) धक्के बसले. नेपाळमध्ये 5.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. नॅशनल अर्थक्वेक मॉनिटरिंग अँड रिसर्च सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी भूकंपाचे हादरे बसले असून यामध्ये कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नसल्यांचही सांगितलं जात आहे. (earthquake-in-Nepal-wednsday-morning-5-point-8-magnitude)

याबाबत एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, काठमांडूपासून 113 किलोमीटर अंतरावर भूकंपाचे केंद्र होते. सकाळी 5 वाजून 42 मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले. सीस्मॉलॉजिस्ट डॉक्टर लोकविजय अधिकारी यांनी सांगितले की, सकाळी पावणे सहाच्या सुमारास भूकंप आला. भूकंपाचे केंद्र लामजुंग जिल्ह्यात होते. याची तीव्रता 5.8 रिश्टर स्केल इतकी होती.

Earthquake
‘ब्रँड मोदी’साठी केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होऊ शकतात

याआधी फेब्रुवारी महिन्यात नेपाळच्या लोबुयामध्ये भूकंप झाला होता. तेव्हा युएस जिओलॉजिकल सर्व्हेने सांगितलं होतं की, तेव्हा भूकंपाची तीव्रता 5.2 रिश्टर स्केल इतकी नोंदवली होती. यानंतर फेब्रुवारीमध्ये भारत नेपाळ सीमेवर 4.8 इतक्या तीव्रतेचा भूकंप झाला. एप्रिलच्या सुरुवातीला सिक्किम नेपाळ सीमेवर 5.4 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. तर भारतात आसाम, बिहार, पश्चिम बंगालमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.