New York Earthquake : न्यूयॉर्क, म्यानमारमध्ये भूकंपाचे धक्के; 5.5, 5.8 तीव्रतेचे हादरे

गुरुवारी हिमाचल प्रदेशमध्ये भूकंपाचे हादरे जाणवले होते. रात्री ९ वाजून ३४ मिनिटांनी धक्के बसले. भूकंपाची तीव्रता ५.३ इतकी होती. जमिनीपासून १० किलोमीटर खोल भूकंपाचं केंद्र होतं. या भूकंपामुळे कुठलीही जीवितहानी झालेली नाही.
Earthquake
Earthquakeesakal
Updated on

नवी दिल्लीः न्यूयॉर्क आणि म्यानमारमध्ये भूकंपाचे हादरे बसले आहेत. न्यूयॉर्कमध्ये ५.५ तर म्यानमारमध्ये ५.८ तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसले आहेत.

संयुक्त राज्य भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार शुक्रवारी १० वाजून २३ मिनिटांनी न्यूर्यार्क सिटीमध्ये ५.५ तीव्रतेचा भूकंप झाला. या हादऱ्यामुळे इमारती दरदरून गेल्या होत्या. न्यूयॉर्क टाईम्सने भूकंपाची तीव्रता ४.८ असल्याचा दावा केला आहे.

यूएसजीएसने सांगितलं की, भूकंपाचं केंद्र मैनहट्टनपासून ५० किलोमीटर पश्चिममध्ये लेबनान, एन.जे. मध्ये होतं. माहितीनुसार, फिलाडेल्फियामधल्या बोस्टनपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

Earthquake
Balochistan: पाकिस्तानात माणसाच्या जीवाला किंमत आहे की नाही? महिन्याभरात 'इतक्या' लोकांचे अपहरण

पूर्वेकडच्या अनेक विमानतळांवरील उड्डाणं तातडीने थांबवण्यात आलेली होती. न्यूयॉर्कमध्ये कुठलंही नुकसान झालं नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

दुसरीकडे म्यानमारमध्ये शुक्रवारी ५.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. हा भूकंप 10 किमी (6.2 मैल) खोलीवर होता, असे रॉयटर्सने युरोपियन मेडिटेरेनियन सिस्मॉलॉजिकल सेंटर (EMSC) चा हवाला देत सांगितलं आहे.

Earthquake
Taiwan Nurses : भूकंपामध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून केलं बाळांचं रक्षण; तैवानच्या रुग्णालयातील 'हिरकण्यां'चा व्हिडिओ व्हायरल

दरम्यान, गुरुवारी भारतातल्या हिमाचल प्रदेशमध्ये भूकंपाचे हादरे जाणवले होते. रात्री ९ वाजून ३४ मिनिटांनी धक्के बसले. भूकंपाची तीव्रता ५.३ इतकी होती. जमिनीपासून १० किलोमीटर खोल भूकंपाचं केंद्र होतं. या भूकंपामुळे कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()