Japan Earthquake : वर्षाच्या पहिल्याच दिवशी जपानला भूकंपाचा धक्का! त्सुनामीचाही इशारा; पाहा व्हिडिओ

जपानमधील या भूकंपानंतर तेथील दृश्ये समोर आली आहेत. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 7.2 एवढी होती.
earthquake
earthquakeeSakal
Updated on

Japan Earthquake : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जपानमध्ये नैसर्गिक आपत्ती आली आहे. जपानजवळ समुद्रात 7.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्यामुळे, देशाच्या पश्चिम किनारपट्टीला त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. (Japan Tsunami Alert)

जपानमधील या भूकंपानंतर तेथील दृश्ये (Japan earthquake visuals) समोर आली आहेत. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 7.6 एवढी होती. हा अत्यंत धोकादायक प्रकारचा भूकंप समजला जातो. या तीव्रतेचा भूकंप शहरात झाल्यास, मोठमोठ्या इमारती कोसळू शकतात.

जपानच्या हवामान विभागाने देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरील शहरांना त्सुनामीचा इशारा (Tsunami Warning) दिला आहे. यामध्ये इशिकावा, नीगाता आणि तोयामा या शहरांचा समावेश आहे. एकापाठोपाठ एक असे भूकंपाचे धक्के बसल्यामुळे हा इशारा देण्यात आला आहे. या त्सुनामीमध्ये पाच मीटर उंचीच्या लाटा येण्याची शक्यता आहे. वाजिमा शहराच्या किनारी भागात एक मीटर उंचीच्या लाटा येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

earthquake
Baba Vanga Predictions for 2024 : पुतीन यांची हत्या ते जागतिक आर्थिक संकट... नव्या वर्षासाठी बाबा वेंगांची भाकितं

न्यूक्लिअर पॉवर पॉईंट

जपानमधील एनएचके टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, या भूकंपामुळे न्यूक्लिअर पॉवर प्लाँटला काही धोका निर्माण झाला आहे का याबाबत तपासणी सुरू आहे. हे प्लांट होकुरिकू इलेक्ट्रिक पॉवर कंपनीचे आहेत.

दरम्यान या भूकंपामुळे दक्षिण कोरियानेही आपल्या किनारी भागातील शहरांना इशारा दिला आहे. समुद्राच्या पातळीत वाढ होण्याचा धोका असल्याचं या इशाऱ्यात म्हटलं आहे.

किती धोकादायक भूकंप?

रिश्टर स्केलवर 7 ते 8 तीव्रतेचा भूकंप भरपूर धोकादायक (How dangerous is 7 magnitude earthquake) समजला जातो. या तीव्रतेच्या भूकंपामध्ये इमारती कोसळण्याचा आणि रस्ते दुभंगण्याचा धोका असतो. शहरात या भूकंपाचा केंद्रबिंदू नसल्यामुळे जपानला सध्या मोठा धोका नाही. मात्र, समुद्रात भूकंप झाल्यामुळे मोठमोठ्या त्सुनामीच्या लाटा येण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळेच किनारी भागातील शहरांना इशारा देण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()