Earthquake update : तुर्कीमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 6.3 मोजण्यात आळी आङे. युरोपीयन भूमध्य भूकंप विज्ञान केंद्र (EMSC) ने दिलेल्या रिपोर्टनुसार तुर्की-सीरिया सीमा प्रदेशात दोन किमी (1.2 मैल) खोलीवर 6.3 तीव्रतेचा भूकंप झाला. तुर्कस्तानच्या दक्षिणेकडील हाटे प्रांतात सोमवारी भूकंपाचे दोन धक्के जाणवले.
या भूकंपानंतर तुर्कीचे गृहमंत्री सुलेमान सोयलू (Suleyman Soylu) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ताज्या भूकंपात तीन जणांचा मृत्यू झाला असून 213 जण जखमी झाले आहेत. भूकंपाच्या धक्क्यांमुळे लोक घराबाहेर पडले आणि सर्वत्र गोंधळ उडाल्याचे चित्र होते.
या भूकंपाच्या धक्क्यांमुळे अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे. तुर्कीचा शेजारच्या लेबनॉनची राजधानी बेरूतमध्येही हाटे प्रांतात 6.4 आणि 5.8 तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले.
स्थानिक वेळेनुसार सुमारे 20.04 वाजता हाटे येथे 6.4 तीव्रतेचा भूकंप झाला, त्यानंतर तीन मिनिटांनंतर 5.8 तीव्रतेचा दुसरा भूकंप झाला याचे केंद्र हाटे येथील समंदग येथे होतं, असे डिजास्टर मॅनेजमेंट प्रेसिडेन्सी (AFAD) ने सांगितले.
दरम्यान यानंतर AFAD ने एक चेतावणी जारी केली आहे. ज्यामध्ये समुद्राची पातळी 50 सेमी (1.6 फूट) पर्यंत वाढू शकते. म्हणून समुद्राच्या पातळीत वाढ होण्याच्या धोक्यापासून सावधगिरी म्हणून किनारपट्टीच्या भागात जाणे टाळण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. तुर्कीचे उपाध्यक्ष फुअत ओकटे यांनी परिसरातील नागरिकांना नुकसान झालेल्या इमारतींपासून दूर राहण्याचे आवाहन देखील केले.
यापूर्वी तुर्की आणि शेजारच्या सीरीयामध्ये सहा फेब्रुवारी रोजी भूकंपाचे शक्तीशाली धक्के बसले होते. रिश्टर स्केलवर याची तिव्रता 7.8 मोजण्यात आली होती. यानंतर एक-दोन दिवसानंतर या भागांना अनेक लहान-मोठे धक्क बसले होते. या भीषण भूकंपात मरणाऱ्या नागरिकांची संख्या 41,000 हून पुढे गेली आहे. यामध्ये पुन्हा या भागात बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यांनी चिंता वाढवली आहे.
तुर्की-सीरियाच्या मदतीसाठी भारताने बचाव पथक पाठवले होते. संघ बचावकार्य पूर्ण करून ते परतले आहेत. नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF) ची शेवटची टीम तुर्कीहून परतली आहे. भारताकडून 151 जवान आणि श्वानपथकांच्या तीन पथकांनी भूकंपग्रस्त तुर्कस्तानला मदत केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.