तेहराण: इराणमधील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये शिया धर्मगुरू असणारे इब्राहिम रईसी यांनी विजय मिळवला आहे. इराणमधील ओपिनियन पोल्सनी दिलेल्या माहितीनुसार, इब्राहिम रईसी हे राष्ट्राध्यक्ष पदासाठीचे प्रबळ दावेदार होते. अब्दुल नासिर हिम्मती यांनी इब्राहिम रईसी यांना प्रामुख्याने आव्हान दिलं होतं. पण असं असलं तरीही 1997 मध्ये इस्लामिक रिपब्लिकची स्थापना झाल्यापासून देशातील सर्वांधिक बिनविरोध निवडणूक म्हणून या निवडणुकीचं वर्णन विश्लेषकांनी केलं होतं. आता या निवडणुकीत इब्राहिम रईसी यांचा विजय झाला आहे.
इराणच्या अध्यक्षपदी कट्टरतावादी इब्राहिम रईसी (वय ६०) यांनी एकहाती विजय मिळविला. देशाच्या इतिहासात प्रथमच या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी सर्वांत कमी होती. निवडणुकीचे अधिकृत निकाल अद्याप जाहीर झाले नसले तरी रईसी यांच्या विरोधकांनी आधीच हार मानली. रईसी यांच्या विजयावर इराणचे विद्यमान अध्यक्ष हसन रुहानी यांनी कोणाचे नाव न घेता ‘लोकांच्या पसंतीसाठी मी त्यांना शुभेच्छा देतो,’ असे वक्तव्य केले. रईसी यांच्याशिवाय सुरुवातीच्या निकालात रईसी हे एक कोटी ७८ लाख मतांसह सर्वांत पुढे होते. देशाचे सर्वोच्च नेते आयोतल्लाह अली खामेनी यांच्या नेतृत्वाखालील समितीने निवडणुकील तुल्यबळ उमेदवारांना अपात्र ठरविल्याने रईसी यांची बाजू निवडणुकीत वरचढ झाली होती. मोहसीन रेजाई आणि आमीर हुसेन कजिजदाह हाश्मी हे आणखी दोन कट्टरतावादी उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या दोघांनीही हार मानत रईसी यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले.
सुधारणावादी नेत्याची माघार
अध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी (ता.१८) झाली. त्याआधीच दोन उमेदवारांनी माघार घेतल्याने रिंगणात पाच उमेदवार होते. सुधारणावादी उमेदवार आणि माजी उपाध्यक्ष मोहसीन मेहरालिजादेह यांनी माघार घेतल्याने सेंट्रल बँकेचे माजी गव्हर्नर अब्दुलनासर हेममती यांच्या विजायाची शक्यता वाढली होती. हसन रुहानी हे दोनदा अध्यक्ष झाल्याने इराणमधील नियमानुसार ते निवडणूक लढवू शकत नाहीत.
इराण या मध्यपूर्वेतील देशाचं राजकारण हे मुख्यत: तेलावरच अवलंबून आहे. त्यामुळे इराणमधील राजकीय स्थैर्य हे जागतिक पातळीवरील शांततेसाठी आवश्यक मानलं जातं. इराणमध्ये याआधी हसन रुहानी हे राष्ट्राध्यक्ष पदावर होते. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर काल 18 जून रोजी ही निवडणूक पार पडली असून याचा निकाल आज लागणार आहे. इराणमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यकाळ हा 4 वर्षांचा असतो. एक व्यक्ती जास्तीत जास्त दोनवेळाच म्हणजे 8 वर्षेच राष्ट्राध्यक्षपदी राहू शकते. हसन रुहानी हे 2013 सालापासून सत्तेवर असून त्यांनी आपल्या पदाची आठ वर्षे यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत.
इब्राहिम रईसी हे कट्टरपंथी शिया धर्मगुरु आहेत. ही निवडणूक तेच जिंकण्याची जास्त शक्यता वर्तवली जात होती. त्यांचं वय आता 60 वर्षे असून ते रईसी न्यायालयाचे प्रमुख आहेत. या निवडणुकीत सहा जणांनी त्यांना आव्हान दिलं होतं. मात्र, या निवडणुकीत त्यांचंच पारडं जड होतं. 1979 साली झालेल्या क्रांतीनंतर इब्राहिम रईसी न्यायपालिकेत कार्यरत आहेत. बहुतांश काळ ते सरकारी वकील होते. या निवडणुकीत इब्राहिम रईसी यांना सहाजणांनी आव्हान दिलं आहे. यामध्ये मोहसिन रेझाई, सईद जालिली, मोहसिन मेहरालिजादेह, अब्दुल नासिर हिम्मती, हुसन काजिजादेह हाशमी यांचा समावेश आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.