इक्वेडोरमध्ये भूस्खलनाने प्रचंड नुकसान; २२ जणांचा मृत्यू, तर ३२ जखमी

इक्वेडोरमध्ये झालेल्या भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले आहे.
Ecuador Landslide News
Ecuador Landslide Newsesakal
Updated on

नवी दिल्ली : इक्वेडोरमध्ये (Ecuador) झालेल्या भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले आहे. राजधानी क्विटोत (Quito) २२ जणांचा मृत्यू झाला आहे. अतिवृष्टीमुळे येथील घरे भूस्खलनाने उद्ध्वस्त झाले आहे. मंगळवारी (ता.एक) अधिकाऱ्यांनी सांगितले की नैसर्गिक संकटामुळे प्रचंड हानी झाली आहे. क्विटो सुरक्षा विभागाच्या वतीने सांगण्यात आले, की ३२ लोक जखमी झाले आहेत. आठ घरे पूर्णपणे पडली आहेत. या व्यतिरिक्त इतर घरांचेही नुकसान झाले आहे. क्विटोत जवळपास २४ तास पाऊस पडला आहे. त्यानंतर हाहाकार माजला आहे. बचाव टीमसह स्थानिकांनी नागरिकांना अत्यावश्यक सेवा पोहोचवण्यात आले आहे. अचानक खिडक्या आणि दरवाजांमधून घरात पाणी भरु लागले, असे आपत्तीचे वर्णन महिलेने केले. (Ecuador Landslides Kill 22 Peoples, 32 Injured)

Ecuador Landslide News
नवीन Maruti Balenoची बुकिंग सुरु, लाँच कधी होणार जाणून घ्या

घर पत्त्यांसारखे कोसळू लागण्याच्या अगोदर त्या बाहेर पडल्या. वृत्तसंस्था असोसिएट प्रेसशी बोलताना त्या म्हणाल्या, मी आपल्या चार वर्षांच्या मुलाला घेऊन शिड्यांकडे धावत होते, तेव्हा अचानक माझ्या समोरची भिंत धडकन कोसळली. मी कशी तरी तेथून बाहेर पडले. भूस्खलनग्रस्तांनी सांगितले की सोमवारच्या रात्री झालेल्या अतिवृष्टीनंतर वाहने, मोटारसायकलसह इतर गाड्यांवर चिखलाचा थर साचला होता. जेव्हा मदत कार्य सुरु करण्यात आले होते तेव्हा लोकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले होते. कारण नुकसानग्रस्तांचे आवाज ऐकून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न केले जाऊ शकते.

Ecuador Landslide News
UNमध्ये युक्रेनवरील मतदानास भारताचा नकार, अमेरिकेचा दबाव असताना रशियाला पाठिंबा

क्विटोचे महापौर सँटिगो गाॅरडेरास म्हणाले, अतिवृष्टीमुळे चिखल जमा झाले होते. त्यानंतर भूस्खलन झाले. टॅक्सीसह अनेक वाहने चिखलाच्या खाली दबले गेले होते. मदत पथक आणि स्थानिक लोकांनी एकत्र येत चिखल बाजूला सारुन अनेकांना मदत केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.