Ecuador : राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराची गोळ्या घालून हत्या; देशाच्या स्वातंत्र्यदिनी गंभीर घटना! व्हिडिओ समोर

Fernando Villavicencio : फर्नांडो हे इक्वाडोरच्या राष्ट्रपती पदाचे प्रबळ दावेदार होते.
Ecuador presidential Candidate shot dead
Ecuador presidential Candidate shot deadeSakal
Updated on

Presidential Candidate Shot Dead : इक्वाडोर देशातून एक गंभीर घटना समोर आली आहे. राष्ट्रपती पदाचे उमेदवार फर्नांडो व्हिलाव्हिन्सेंसिओ यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. बुधवारी क्विटो शहरातील एका रॅलीनंतर त्यांच्यावर हल्ला झाला. अंतरिम मंत्री हुआन झपाटा यांनी याबाबत ट्विट केलं आहे.

या महिन्यात इक्वाडोरमध्ये राष्ट्रपती पदासाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. यासाठी २० ऑगस्ट रोजी मतदान पार पडेल. मतदानाच्या दहा दिवस आधीच फर्नांडो यांची हत्या झाल्यामुळे देशात खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे आजच इक्वाडोरचा स्वातंत्र्यदिन आहे. आजच्याच दिवशी हा देश स्पेनपासून स्वतंत्र झाला होता.

Ecuador presidential Candidate shot dead
America Cancer invades : अमेरिकेच्या अण्वस्त्र तळावर कर्करोगाचा शिरकाव, २६८ जणांना लागण

घटनेचा व्हिडिओ व्हायरल

या संपूर्ण घटनेचे काही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका व्हिडिओमध्ये फर्नांडो प्रचार यात्रेनंतर आपल्या गाडीत बसताना दिसत आहेत. याच वेळी त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आल्याचं व्हिडिओत दिसतंय. या घटनेमध्ये आणखी काही लोक जखमी झाल्याचंही समोर आलं आहे. मात्र, जखमींची संख्या अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. (Global News)

फर्नांडो हे बिल्ड इक्वाडोर चळवळीचे नेते होते. यावर्षीच्या राष्ट्रपतीपदाच्या आठ उमेदवारांपैकी ते एक होते. देशाचे माजी राष्ट्रपती राफाएल कोरेआ यांच्या कार्यकाळात फर्नांडो यांनी भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला होता. त्यांनी राफाएल यांच्याविरोधात कोर्टामध्ये कित्येक खटले दाखल केले होते.

Ecuador presidential Candidate shot dead
Pakistan News: पाकमध्ये मोठ्या घडामोडी! मध्यरात्री पाकिस्तानची संसद बरखास्त, राष्ट्रपतींचा मोठा निर्णय

गुन्हेगारांवर होणार कारवाई

देशात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. आज या गुन्हेगारांनी हद्द ओलांडली असून, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असं मत इक्वाडोरचे राष्ट्रपती गुईलेर्मो लास्सो यांनी व्यक्त केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.