Suez Canal: जहाज अडकण्यामागे इजिप्तची पहिली महिला शिप कॅप्टन जबाबदार?

suez canal.
suez canal.
Updated on

नवी दिल्ली- इजिप्तमधील पहिल्या महिला शिप कॅप्टन मारवा इल्सेलेहडर Marwa Elselehdar सध्या फेक न्यूज कॅम्पेंनच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. त्यांच्यावर जगातील सर्वाधिक व्यस्त मानला जाणारा व्यापार मार्ग सुएझ कालव्या ब्लॉक करण्यासाठी दोषी ठरवलं जातंय. यासंबंधी फेक न्यूज पसरवल्या जात आहेत. पण, ज्यावेळी एवर गिवेन जहाज सुएझ कालव्यामध्ये अडकल्याची बातमी आली होती, त्यावेळी 29 वर्षीय मारवा इल्सेलेहडर शेकडो किलोमीटर दूर अॅलक्झांडरिया बंदरावर आपली ड्यूटी बजावत होत्या. बीबीसीने यासंदर्भातील वृत्त दिलंय.  मारवा यांनी या आरोपांचे खंडन केलंय. आरोपांमुळे मला धक्का बसला आहे. मी एक महिला असून आपल्या कामात यशस्वी झाली आहे किंवा मी इजिप्शियन असल्याने मला जाणूनबुजून लक्ष्य केलं जातंय, असं त्या म्हणाल्या आहेत. 

मारवा इल्सेलेहडर या 2 टक्के महिलांमध्ये मोडतात ज्या समुद्री सफरीमध्ये महत्त्वाच्या पदावर गेल्या आहेत. मारवा म्हणाल्या की, 'आमच्या समजामध्ये महिलांना काम करणं, आपल्या परिवारापासून अनेक वर्ष दूर राहणं अशा गोष्टी स्वीकारल्या जात नाही. पण, तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही करत असाल तर तुम्हाला कोणाच्याही परवानगीची आवश्यकता लागत नाही'.

सुएझ कालव्यामध्ये जगाज अडकण्यासाठी मारवा इल्सेलेहडर जबाबदार असल्याचे खोटे स्क्रिन शॉट सोशल मीडियावर व्हायरल केले जात होते. विशेष म्हणजे मारवा यांच्याबाबतची फेक न्यूज इंग्रजीमधून देण्यात आली होती. त्यामुळे ही बातमी इतर देशांमध्येही पसरली. मारवा इल्सेलेहडर यांना जेव्हा याबाबत माहिती मिळाली, तेव्हा त्यांना धक्काच बसला. कारण, सुएझ कालव्यात जेव्हा जहाज अडकल्याची घटना घडली, तेव्हा त्या शेकडो किलोमीटर दूर आपली सेवा बजावत होत्या. त्यांची प्रतिष्ठा खराब करण्यासाठी फेक न्यूज पसरवल्या जात असल्याचं मारवा म्हणाल्यात. 

दरम्यान, जगातील 12 टक्क्यांपेक्षा अधिक व्यापार सुएझ कालव्यामधून होतो. एवर गिवेन नावाचे एक महाकाय मालवाहतूक जहाज या कालव्यात मधोमध अडकले. कालवा पूर्णपणे ब्लॉक झाल्याने व्यापार ठप्प झाला. जवळपास 300 पेक्षा अधिक मालवाहतूक जहाजे मार्ग मोकळा होण्याची वाट पाहात उभे होते. यामुळे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले. आवश्यक वस्तूंची आवक-जावक पूर्णपणे थांबली. अथक प्रयत्नानंतर 6 दिवसांनी हे जहाज बाहेर काढण्यात यश आलं. विशेष म्हणजे या जहाजावरील सर्वच्या सर्व 25 क्रू मेंबर्स भारतीय होते. त्यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.