World Population: या मुलीच्या जन्माने जगाच्या लोकसंख्येने पार केला 8 अब्जाचा टप्पा

जगाची लोकसंख्या आठ अब्जांवर पोहोचेली, असा दावा संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात करण्यात आला.
World Population
World Populationsakal
Updated on

 जगाची लोकसंख्या आठ अब्जांवर पोहोचेली, असा दावा संयुक्त राष्ट्रांच्या (United Nations) अहवालात करण्यात आला. फिलीपींस येथील मनीलाच्या टोंडो येथे एका मुलीच्या जन्मानंतर जगाने आठ अब्ज लोकसंख्या पार केली आहे.

सध्या ही मुलगी जगभरात चर्चेचा विषय आहे. या फिलीपींसच्या जनसंख्या आणि विकास आयोगने एका फेसबुक पोस्टमध्ये आई आणि मुलीचा फोटो शेअर करत या विषयी माहिती दिली. (eight billionth child born in the world in Manila philippines )

पोस्टमध्ये लिहले, "टोंडोमध्ये जन्मलेल्या एका मुलीने जगाची लोकसंख्या माइलस्टोनवर पोहचवली. त्यामुळे या मुलीला आठवी अब्जवी व्यक्ती म्हणून ओळखले जाणार आहे.

या मुलीचे स्वागत 15 नोव्हेंबर रोजी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये करण्यात आले. नर्सेस सोबत यावेळी जनसंख्या आणि विकास आयोगचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 जगाची लोकसंख्याविक्रमी पातळीवर आठ अब्जांवर पोहोचेली आहे. 1950 नंतर जगातली लोकसंख्येचा वेग मंदावला. संयुक्त राष्ट्रांच्या या अहवालानुसार जगाची लोकसंख्या 7 वरुन 8 अब्जांपर्यंत पोहोचण्यासाठी तब्बल 12 वर्षे लागली त्यामुळे आता 9 अब्जांपर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास 15 वर्षे लागू शकतात त्यामुळे 2036-37 पर्यंत जगाची लोकसंख्या 9 अब्जांपर्यंत पोहोचू शकते.

येत्या वर्षभरात भारत चीनला लोकसंख्येत मागे टाकणार असल्याचा दावा संयुक्त राष्ट्रांच्या या अहवालात करण्यात आला. जर असे झाले तर भारत हा जगातला सर्वात मोठी लोकसंख्या असलेला देश ठरणार आहे. यामागील कारण म्हणजे चीनच्या लोकसंख्येत होणारी घट.

सोबतच येणाऱ्या काही वर्षात काही देशांची लोकसंख्या ही झपाट्याने वाढणार आहे. यामध्ये , भारत, नायजेरिया, पाकिस्तान, कांगो, इजिप्त, कांगो, इजिप्त, इथियोपिया आणि टांझानिया इत्यादी देशांचा समावेश आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()