नवी दिल्ली- भारताच्या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांना कतारने मृत्यूदंडाची शिक्षा बुधवारी सुनावली आहे. हेरगिरी केल्या प्रकरणी त्यांना ही शिक्षा झाल्याचं सांगण्यात आलं होतं. पण, शिक्षेमागचं नेमकं कारण आणि कोणत्या प्रकारची हेरगिरी करण्यात आली याबाबत खुलासा करण्यात आला नव्हता. एका रिपोर्टनुसार, भारतीय नौदल अधिकाऱ्यांना इस्राइलसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
रॉयटर्सने भारत आणि कतारमधील सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. भारतीय अधिकारी ऑगस्ट २०२२ मध्ये कतारच्या गुप्तहेर यंत्रणेने ताब्यात घेतले होते. भारतीय अधिकाऱ्यांवरील आरोप अधिकृतरित्या भारत किंवा कतार सरकारकडून जाहीर करण्यात आलेले नाहीत. ( Eight former Indian Navy personnel who were sentenced to death by a court in Qatar on Wednesday were charged with allegedly spying for Israel)
भारत आणि कतारच्या परराष्ट्रमंत्रालयांनी या मुद्द्यावर प्रतिक्रिया देण्यापासून नकार दिला आहे. आठ नौदल अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावल्याचा निकाल कतारने दिल्याने भारताने यावर प्रतिक्रिया दिली होती. या माहितीमुळे मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणात सर्व प्रकारच्या कायदेशीर पर्यायांचा अवलंब केला जाईल, असं भारताकडून म्हणण्यात आलं होतं.
भारतीय नौदल अधिकाऱ्यांच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेच्या निर्णयामुळे आम्हाला मोठा धक्का बसला आहे. अधिकच्या माहितीची आम्ही वाट पाहात आहोत. आम्ही अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांशी आणि कायदेशीर टीमच्या संपर्कात आहोत. सर्व प्रकारच्या कायदेशीर पर्यायांचा विचार केला जात आहे, असं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं होतं.
विशेष म्हणजे कतारमध्ये ८ लाखांपेक्षा जास्त भारतीय नागरिक राहतात. कॅप्टन सोरभ वशिष्ठ, कमांडर पूर्णेंदू तिवारी, कॅप्टन बीरेंद्र कुमार वर्मा, कमांडर सुगुनाकर पकाला, कमांडर संजीव गुप्ता, कमांडर नागपाल आणि राजेश या अधिकाऱ्यांना कतारने शिक्षा सुनावली आहे. या सर्व अधिकाऱ्यांनी नौदलात सेवा बजावली आहे. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.