elections in bangladesh today amide violence sheikh hasina government BNP Marathi news
elections in bangladesh today amide violence sheikh hasina government BNP Marathi news

Bangadesh Election : हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशात आज मतदान! २७ पक्षांचे सुमारे १५०० उमेदवार रिंगणात

बांगलादेशमध्ये आज (ता. ७) सार्वत्रिक निवडणुका होत असून, या निवडणुकीच्या देखरेखीसाठी शंभराहून अधिक परकी निरीक्षक ढाक्यात पोचले आहेत.
Published on

ढाका : बांगलादेशमध्ये आज (ता. ७) सार्वत्रिक निवडणुका होत असून, या निवडणुकीच्या देखरेखीसाठी शंभराहून अधिक परकी निरीक्षक ढाक्यात पोचले आहेत. या निरीक्षकांत तीन भारतीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

आवामी लीगने ‘बीएनपी’वर हिंसाचार पसरविल्याचा आरोप केला आहे. काल खुलना येथे एक शाळा पेटवून देण्यात आली होती. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. अलिकडेच एका प्रवासी बसला देखील आग लावण्यात आली होती. दुसरीकडे ‘बीएनपी’सह अन्य विरोधी पक्षांनी निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे.

हंगामी सरकार स्थापन करण्याची मागणी केली जात असून त्यांच्या देखरेखीखाली निष्पक्षपणे निवडणूका पार पडतील, अशी ‘बीएनपी’ची मागणी आहे. मात्र शेख हसिना यांच्या नेतृत्वाखालील आवामी लीगने विरोधकांची मागणी फेटाळून लावली. त्यामुळे उद्याच्या निवडणुकीसाठी कडक बंदोबस्त ठेवला आहे. हिंसाचार भडकण्याची शक्यता असल्याने संवेदनशील भागात कुमक जादा तैनात केली आहे.

elections in bangladesh today amide violence sheikh hasina government BNP Marathi news
Israel-Hamas War : हमासच्या नेत्याच्या मृत्यूनंतर हिजबुल्लाहचा इस्राइलवर मोठा हल्ला! डागली 62 क्षेपणास्त्रे

४२ हजार मतदान केंद्र असून ११ कोटी ९६ लाख मतदार आज मतदानाचा अधिकार बजावतील. २७ पक्षांचे सुमारे १५०० उमेदवार रिंगणात आहेत. याशिवाय ४३६ अपक्ष उमेदवार आहेत. आठ जानेवारीपासून मतमोजणीला सुरुवात होईल, असे निवडणूक आयोगाने सांगितले. या प्रक्रियेविरोधात ‘बीएनपी’ने ४८ तासांचा बंद पुकारला आहे.

elections in bangladesh today amide violence sheikh hasina government BNP Marathi news
सौदी अरेबियाचं नशीब पुन्हा चमकलं! तेलानंतर आता पवित्र मक्का शहरात सापडलं सोन्याचं भांडार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.