Elon Musk : मस्कचा AI फॅशन शो बघितला का? मोदी, पुतिन बायडेनसह जगातील दिग्गज नेत्यांचा चित्रविचित्र कपड्यात ‘रँप वॉक’

Elon Musk AI fashion show: स्वतः मस्क यांनी अंतराळवीरांच्या वेशभूषेत आहेत. त्यावर ‘टेस्ला’चा लोगो आहे. टेडी बेअरचे चित्र असलेल्या कपड्यात चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग दिसतात.
AI fashion show
AI fashion showesakal
Updated on

नवी दिल्ली: जगातील अब्जाधीश उद्योगपती एलॉन मस्क यांनी त्यांच्या मालकीच्या ‘एक्स’ या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. त्यांनी त्याला ‘एआय फॅशन शो’ असे शीर्षक दिले आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासह जगभरातील नेते दाखविले आहेत.

चित्रविचित्र कपडे परिधान केलेले नेते मॉडेलप्रमाणे ‘रँप वॉक’ करताना दिसत आहेत. या व्हिडिओत नेत्यांप्रमाणेच जगभरातील दिग्गज उद्योगपती बिल क्लिंटन, टिम कुक यांचाही समावेश आहेत. पोप फ्रान्सिस हेही वेगळ्या अवतारात दिसत आहेत.

या व्हिडिओत मोदी पारंपरिक वेशभूषेत दिसत आहेत. महागडा ब्रँड ‘एलव्ही’चा लोगो असलेले कपडे पुतिन यांनी परिधान केले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन हे स्टायलिश गॉगल लावून व्हिल चेअरवरून येताना दिसत आहेत.

स्वतः मस्क यांनी अंतराळवीरांच्या वेशभूषेत आहेत. त्यावर ‘टेस्ला’चा लोगो आहे. टेडी बेअरचे चित्र असलेल्या कपड्यात चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग दिसतात. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडू आणि उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन हे वेगळ्याच रूपात दाखवले आहेत.

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांना काळा कोट आणि काळ्या गॉगलमध्ये व बास्केटबॉल जर्सीत सादर केले आहे. ‘ॲमेझॉन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जेफ बेझोस आणि ॲपल कंपनीचे ‘सीईओ’ टीम कुक हेही ‘रॅम्प वॉक’ करताना दिसतात.

AI fashion show
Joe Biden: अमेरिकेच्या राजकारणाला कलाटणी! ट्रम्प यांच्यावरील गोळीबारानंतर बायडन यांनी घेतली माघार; भारतीय वंशाच्या उमेदवाराला पाठिंबा

बिल गेट्स यांची ‘ब्लू स्क्रीन-

व्हिडिओच्या शेवटी मायक्रोसॉफ्ट कंपनीचे ‘सीईओ’ बिल गेट्स हे दिसतात. त्यांच्या हातातील फलकावर ‘रनवे ऑफ पॉवर’ असे लिहिले दिसते. नंतर या फलकाचे रूपांतर ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मध्ये होते. गेल्या आठवड्यात मायक्रोसॉफ्टचे सर्व्हर डाऊन झाल्याने जगभरात विविध ठिकाणी विमान, एटीएम, बँकिग आदी सेवा ठप्प झाल्या होत्या.

AI fashion show
Joe Biden Quit: बायडेन यांनी माघार घेण्याचा निर्णय का घेतला? कमला हॅरिस की ट्रम्प, कोण ठरेल वरचढ?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com