एलन मस्कचं थेट पुतीन यांना 'वन-ऑन-वन' युध्दाचं आव्हान, म्हणाले..
रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमाणानंतर (Russia Ukraine War) सगळ्या जगाचे लक्ष या युध्दाकडे लागेले आहे. यातच युक्रेनसाठी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक एलन मस्क (Elon Musk) यांनी मैदानात उतरण्याची तयार दाखवली आहे. मस्क यांनी थेट रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांना वन-ऑन-वन लढाईचे आव्हान दिले आहे. मस्क यांनी ट्विट करत या दोघांच्या लढाईत युक्रेन डावावर असेल असे देखील म्हटले आहे.
युक्रेनवर रशियन हल्ला केल्यापासून इलॉन मस्क हे पुतिनवर सतत हल्ले करत आहेत. एवढेच नाही तर युक्रेनला मदत करण्यासाठी त्याने स्टारलिंक या उपग्रह इंटरनेट सेवा देखील युक्रेनला दिली आहे. मात्र, त्यांनी पुतिन यांना लढतीसाठी आव्हान देण्याची ही पहिलीच वेळ आहे. सोमवारी, एलन मस्क यांनी ट्विट केले आहे की, "मी व्लादिमीर पुतिन यांना सिंगल कॉम्बॅटचे आव्हान देतो. डावावर युक्रेन असेल."
पुतीन यांचे वैयक्तिक ट्विटर खाते नसल्यामुळे, 'तुम्हाला हे युध्द मान्य आहे का?" असे विचारत, मस्क यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या @KremlinRussia_E या अधिकृत ट्विटर हँडलला टॅग करत कंफर्मेशन देखील मागीतले आहे.
रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाबद्दल मस्क यांनी आपल्या भावना आधीच स्पष्ट केल्या आहेत. ते उघडपणे युक्रेनच्या समर्थनात आहेत. आपल्या जीवनशैलीमुळे आणि ट्विटरवरील केलेल्या वक्तव्यांमुळे ते नेहमीच चर्चेत असतात युक्रेनच्या लोकांच्या बाजूने बोलण्यासाठी केवळ त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करत नाहीत, तर त्यांनी त्यांना अधिक ठोस मार्गांनी पाठिंबा दिला आहे. युक्रेनियन लोकांना जगाच्या संपर्कात राहण्यास मदत करण्यासाठी मस्कने स्टारलिंक इंटरनेट स्टेशनवर अनेक शिपमेंट पाठवले आहेत. युद्धग्रस्त देशाला मदत करण्यासाठी त्यांनी गुपचूप काही टेस्ला पॉवरवॉल देखील युक्रेनला पाठवले आहेत.
दरम्यान, युक्रेन आणि रशियाचे प्रतिनिधी आज पुन्हा एकदा चर्चेच्या दुसर्या फेरीसाठी भेटले. दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांमधील शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा आणि बैठकांमधून आतापर्यंत कोणताही तोडगा निघू शकलेला नाहीये.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.