Twitter Deal : मस्क यांना न्यायालयाचे आदेश, ऑक्टोबरपासून सुनावणीला सुरुवात

मस्क यांनी ही डील रद्द केली असल्याने ट्विटरनं हा वाद आता कोर्टात नेला आहे.
Elon Musk Twitter deal cancelled
Elon Musk Twitter deal cancelledsakal
Updated on
Summary

मस्क यांनी ही डील रद्द केली असल्याने ट्विटरनं हा वाद आता कोर्टात नेला आहे.

मागील काही दिवसांपासून एलॉन मस्क आणि ट्विटर यांच्यातील 44 अब्ज कोटींचा करार चर्चेता होता. परंतु टेस्लाचे (Tesla) मालक मस्क यांनी ट्विटर डील मोडल्याने ट्विटरने याविरोधात कोर्टात धाव घेतली आहे. सध्या ट्विटर (Twitter) विरुद्ध एलॉन मस्क (Elon Musk) अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मस्क यांनी ही डील रद्द केली असल्याने ट्विटरनं हा वाद आता कोर्टात नेला आहे. (Elon Musk Twitter deal cancelled)

आता या प्रकरणासंदर्भात ऑक्टोबरपासून खटला सुरु होणार असल्याची माहिती मिळत आहे. मस्क यांनी या खटल्यासाठी फेब्रुवारीपर्यंतची मुदत मागितली होती. पण ट्विटरच्या मागणीनंतर न्यायालयाने हा खटला ऑक्टोबरमध्ये सुरु करण्याचा निर्णय दिला आहे. याप्रकरणी डेलावेअरच्या न्यायाधीशांनी एलॉन मस्क यांना झटका दिला असून या खटल्यावरील सुनावणी ऑक्टोबरपासून सुरु होणार असल्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

Elon Musk Twitter deal cancelled
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत आमदारांना दिली लाच; काँग्रेसची मुर्मू यांच्याविरुध्द तक्रार

याप्रकरणी खटल्यातील विलंबामुळे ट्विटरचे नुकसान होणार असल्याची माहिती न्यायाधिशांनी दिली आहे. या खटल्यासाठी मस्क यांनी फेब्रुवारीमध्ये दोन आठवड्यांची सुनावणी ठेवण्याची मागणी केली होती. मात्र या प्रकरणातील खटल्याची सुनावणी सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस व्हावी अशी मागणी ट्विटरकडून करण्यात आली होती. दरम्यान, न्यायालयाने ऑक्टोबरमध्ये खटल्यावरील सुनावणी होणार असल्याच्या आदेशावर शिक्कामोर्तब केला असून ही सुनावणी पाच दिवसांची असणार आहे.

दरम्यान, एलॉन मस्क यांनी मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर (Twitter) विकत घेणार नसल्याचं जाहीर केलं. कंपनीने अटी मोडल्या असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता ट्विटरची 44 अब्ज डॉलरचा करार संपुष्टात आला आहे. एलॉन मस्क यांनी यासंदर्भात घोषणा करत, आपण ट्विटर विकत घेणार नसल्याचं सांगितलं आहे. एलॉन मस्क यांनी ट्विटरसोबतचा करार संपल्याची घोषणा करत कंपनीवर आरोप केले आहेत.

Elon Musk Twitter deal cancelled
सध्याचं महाभारत संजय राऊतांमुळेच; दानवेंचा हल्लाबोल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.