'ट्विटर'च्या ‘चिमणी’वर मस्क यांचा डोळा

४१ अब्ज डॉलरमध्ये खरेदी करण्याची तयारी
Elon Musk
Elon Musksakal
Updated on

न्यूयॉर्क : जगातील आघाडीचा मायक्रोब्लॉगिग प्लॅटफॉर्म म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ट्विटरच्या संचालक मंडळामध्ये सहभागी होणे टाळल्यानंतर आता उद्योजक आणि टेक्नोक्रॅट एलॉन मस्क यांनी थेट ही ट्विटरची चिमणीच विकत घेण्याची तयारी दर्शविली आहे. यासाठी ४१ अब्ज डॉलर मोजायची तयारी मस्क यांनी दर्शविली आहे. मस्क यासाठी कंपनीचा प्रत्येकी एक शेअर ५४.२० डॉलरला विकत घ्यायला तयार आहेत. कंपनीच्या नियंत्रकाकडे सादर केलेल्या माहितीमध्ये मस्क यांनी याचा स्पष्ट उल्लेख केलेला दिसून येतो.

एक एप्रिल रोजी ट्विटरच्या शेअरची जेवढी किंमत होती त्यापेक्षा ३८ टक्के अधिक किंमत देण्याची तयारी मस्क यांनी दर्शविली आहे. मस्क यांच्या या ऑफरनंतर ट्विटरचे शेअर प्रिमार्केट ट्रेडिंगमध्ये बारा टक्क्यांनी वधारल्याचे दिसून आले. ट्विटरचे अध्यक्ष ब्रेट टेलर यांना लिहिलेल्या पत्रामध्ये मस्क यांनी म्हटले आहे की, ‘‘ या कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यानंतर एक बाब स्पष्टपणे माझ्या लक्षात आली आहे, ती म्हणजे सामाजिकदृष्ट्या अशा कनेक्टेड रूपामध्ये कंपनी वाढू शकत नाही किंवा तिची भरभराट देखील होणे अवघड आहे. ट्विटरला आता एका खासगी कंपनीमध्ये स्वतःचे रूपांतर घडवून आणावे लागेल. मी देऊ केलेली ऑफर ही सर्वांत चांगला प्रस्ताव असून तोच अंतिम देखील आहे.

या प्रस्तावाचा स्वीकार करण्यात आला नाही तर एक समभागधारक म्हणून मला माझ्या भूमिकेचा फेरविचार करावा लागेल.’’ विशेष म्हणजे याच आठवड्यामध्ये मस्क यांनी ट्विटरच्या संचालक मंडळामध्ये सहभागी होण्याचा निर्णय रद्द केला होता ते जर या मंडळामध्ये सहभागी झाले असते तर त्यांना कंपनी ताब्यात घेण्याचे स्वप्न बाजूला ठेवावे लागले असते, अशी माहिती सूत्रांनी दिली. मस्क यांनी मध्यंतरी ट्विट करत एडिट बटनचे फिचर हवे का? अशी विचारणा नेटीझन्सना केली होती त्याचेही सोशल मीडियामध्ये पडसाद उमटले होते. अनेकांनी मस्क यांच्या प्रस्तावाचे स्वागत केले होते.

वेगवेगळ्या प्रतिक्रिया

मस्क यांच्या या ऑफरवर सोशल मीडियामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अनेकांनी यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याला चाप लागू शकतो अशी भीती व्यक्त केली आहे. ट्विटरचे संचालक मंडळ मस्क यांची ही ऑफर स्वीकारणे अवघड असल्याचे मत काहींनी मांडले आहे. याआधीही मस्क यांनी ट्विटरमध्ये खूप साऱ्या क्षमता असून त्या आपण उघड करू असे म्हटले होते.

मस्क म्हणतात...

  • ट्विटर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्लॅटफॉर्म बनू शकतो

  • अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे लोकशाहीसाठी आवश्यक

  • कंपनीचे विद्यमान स्वरूप बदलणे खूप गरजेचे आहे

  • आहे त्या स्थितीमध्ये ही कंपनी पुढे जाणे अशक्य

  • माझा हा प्रस्ताव सर्वांत चांगला आणि अंतिम आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()