Google को-फाऊंडरच्या बायकोसोबत एलॉन मस्कचं अफेअर? ट्वीट करत म्हणाला...

सर्गेई ब्रिन आणि एलॉन मस्क हे चांगले मित्र आहेत आणि त्यांचं एकमेकांच्या घरी येणंजाणंही असतं.
Elon Must Sergey Brin
Elon Must Sergey BrinSakal
Updated on

गुगलचे सहसंस्थापक सर्गेई ब्रिनने काही महिन्यांपूर्वी घटस्फोटासाठी अर्ज केला होता. एलॉन मस्कसोबत आपल्या पत्नीचं अफेअर असल्याचं सांगत त्यांनी वेगळं होण्याची मागणी केली होती. ब्रिननेच २००८ साली आलेल्या आर्थिक संकटावेळी एलॉन मस्कच्या टेस्ला कंपनीला वाचवलं होतं. अशातच आता नव्या चर्चा होऊ लागल्या आहेत.

वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या वृ्त्तानुसार, एलॉन मस्क आणि सर्गेई ब्रिन बराच काळ चांगले मित्र होते. दोघांचं एकमेकांच्या घरी येणंजाणंही होतं. याच दरम्यान, मस्क आणि ब्रिनची पत्नी शनहान यांचं अफेअर सुरू झालं. शनहानच्या एका जवळच्या व्यक्तीने जर्नलला सांगितलं की ब्रिन आणि शनहान वेगळे झाले होते. मात्र अफेअरच्या काळात दोघे एकत्र राहत होते.

ब्रिनने जानेवारीमध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला होता. मस्क आणि शनहानच्या अफेअऱबद्दल कळताच त्याने घटस्फोटाची मागणी केल्याचं जर्नलने सांगितलं होतं. मात्र ब्रिनने याबद्दल कोणतंही भाष्य केलेलं नाही. तर शनहाननेही याविषयावर बोलणं टाळलं आहे.

एलॉन मस्कने मात्र याविषयी मौन सोडलं आहे. ट्वीट करत त्याने याबद्दल माहिती दिली आहे. ह्या सगळ्या गोष्टी निव्वळ निराधार आहे. मी आणि सर्गेई मित्र आहोत आणि काल रात्री एकत्र पार्टी करत होतो. मी निकोल शनहानला तीन वर्षात केवळ दोन वेळाच पाहिलंय, तेही आजूबाजूला असंख्य लोक असताना. त्यामध्ये काहीही रोमँटिक नव्हतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()