Elon Musk Car In Space: भारताच्या चांद्रयान ३ मोहिमेमुळे देशभरात आनंदाचे वातावरण आहे. संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या मोहिमेकडे आहे. मात्र तुम्हाला माहीत आहे का? इलॉन मस्कची कंपनी स्पेस एक्सने सुमारे 5 वर्षांपूर्वी एक अनोखा पराक्रम केला होता.
इलॉन मस्कने टेस्ला कार अंतराळात सोडली होती. ही गाडी अनंत प्रवासाला निघाली होती. आता ही कार कुठे आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
6 फेब्रुवारी 2023 या लाल रंगाच्या कारला अवकाशात जाऊन अधिकृतपणे पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. whereisroadster.com या ट्रॅकिंग वेबसाईटनुसार, आतापर्यंत कारने सूर्याच्या जवळपास तीन प्रदक्षिणा पूर्ण केल्या आहेत. ही कार पृथ्वीपासून 327 दशलक्ष किमी अंतरावर आहे. (Chandrayaan 3 Latest News)
तर ८ ऑक्टोबर 2020 रोजी टेस्ला रोडस्टरने मंगळाच्या जवळचा पहिला पल्ला गाठला होता. त्यानंतर 6 डिसेंबर 2021 इलॉन मस्कने ट्वीट केले होते की त्याची कार मंगळाच्या कक्षेत आहे. मात्र, आता ही कार कुठे आहे? तिचे अनेक तुकडे झाले का, असा प्रश्न निर्माण होत आहे. कारण ती कार उल्कापिंडांच्या धडकेने तुटण्याची शक्यता आहे.
2018 पासून रोडस्टरचे कोणतेही प्रत्यक्ष निरीक्षण झालेले नाही. स्पेसएक्सच्या फाल्कन हेवी रॉकेटद्वारे ते अंतराळात नेण्यात आले. सध्या उपलब्ध असलेला डेटा कारच्या प्रक्षेपणाच्या अंदाजाने बनलेला आहे. (Latest Marathi News)
एका अहवालानुसार खगोलशास्त्रज्ञ या कारला सतत ट्रॅक करू शकत नाहीत, कारण यासाठी खूप खर्च येईल. 2018 मध्ये ही कार फाल्कन हेवी रॉकेट माध्यमातून अंतराळात नेण्याची कल्पना आली. इलॉन मस्क गृहीत धरले होते की हे मिशन यशस्वी होण्याची शक्यता 50-50 टक्के असू शकते. त्यानंतर प्रक्षेपण कोणत्याही अडचणीशिवाय यशस्वी झाले. तेव्हापासून आतापर्यंत ही कार अंतराळात फिरत असल्याची माहिती आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.