Elon Musk : इलॉन मस्क यांनी लॉन्च केली xAI कंपनी

elon musk
elon musk
Updated on

नवी दिल्ली - टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ तसेच ट्विटरचे मालक इलॉन मस्क, यांनी बुधवारी “विश्वाचे खरे स्वरूप समजून घेण्याच्या उद्देशाने AI संबंधीत xAI कंपनीची घोषणा केली. कंपनीच्या वेबसाइटनुसार, मस्क आणि त्यांची टीम शुक्रवारी ट्विटर स्पेसेसद्वारे याबाबत अधिक माहिती देणार आहे.

elon musk
Ajit Pawar : कुणीही अर्थमंत्री बनला, तरी काम करण्याची क्षमता ठेवावी; शिंदे गटाच्या नेत्याचं विधान

कंपनीच्या वेबसाइटनुसार xAI च्या टीममध्ये DeepMind, OpenAI, Google Research, Microsoft Research आणि Tesla चे माजी विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांनी DeepMind सह AlphaCode आणि OpenAI च्या GPT-3.5 आणि GPT-4 चॅटबॉट्ससह प्रकल्पांवर काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. ChatGPT, Bard आणि Claude सारख्या आघाडीच्या चॅटबॉट्सच्या मागे असलेल्या OpenAI, Google आणि Anthropic सारख्या कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी मस्क xAI ला प्राधान्य देत असल्याचे दिसते.

स्टार्टअपची बातमी यापूर्वी 'द फायनान्शिअल टाईम्स'ने एप्रिलमध्ये दिली होती. तसेच मस्क यांनी संभाव्य भाषेच्या मॉडेलला शक्ती देण्यासाठी Nvidia कडून हजारो GPU प्रोसेसरची ऑर्डर दिली आहे. एप्रिल महिन्यातच, मस्क यांनी फॉक्स न्यूज चॅनेलवरील मुलाखतीदरम्यान “TruthGPT” नावाच्या नवीन एआय टूलसाठी त्याच्या योजनांचा तपशील सामायिक केला होता. शिवाय विद्यमान AI कंपन्या "राजकीयदृष्ट्या योग्य" असलेल्या प्रणालींना प्राधान्य देत आहेत, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.