Elon Musk Networth : अरेरे.., मोदींची भेट फळली नाही ! इलॉन मस्कने एका झटक्यात गमावले 87 हजार कोटी

इलॉन मस्क जगातला सर्वात श्रीमंत माणूस समजला जातो.
Elon Musk Networth
Elon Musk Networthesakal
Updated on

Elon Musk Loss Of 87 Thousand Cr.: सध्या मोदींच्या अमेरिका दौऱ्याची चर्चा सुरु असताना दोन्ही देशांच्या आर्थिक, राजकीय संबंध सुधारण्याच्या दृष्टीने या भेटीविषयी बोलले जात आहे. मात्र जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्कसाठी ही भेट तितकीशी फळली नाही.

गेले २४ तास त्याच्यासाठी फार वाईट ठरले आहेत. त्याने एका झटक्यात ८७ हजार कोटी रुपये गमावले आहेत.

इलॉन मस्कच नेटवर्थ एका झटक्यात १०.७ अरब डॉलर म्हणजे साधारण ८७ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्तचे नुकसान झाले आहे. एक दिवस आधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट घेतली त्यावेळी संपत्ती जोरदार वाढ झाल्याचे दिसून आले होते. टेस्लाचे भारतातील आगमनासंदर्भात मस्क यांनी केलेल्या घोषणेनंतर टेस्लाचे शेअर्स ५ टक्क्यांनी वाढले होते.

Elon Musk Networth
PM Modi Met Elon Musk: इलॉन मस्कही PM मोदींचे फॅन! पंतप्रधानाच्या भेटीनंतर म्हणाले, 'भारताच्या भविष्याबद्दल...'

या नंतर त्यांचे नेटवर्थ ९.९५ अरब डॉलर्सने वाढले होते. पण हा फायदा एका दिवसानंतरच नुकसानात बदलला. बुधवारी Tesla Inc चे स्टॉक ५.४६ टक्क्यांनी घसरला आणि इलॉन मस्क यांना मोठे नुकसान झाले. त्यांच्या संपत्तीत आलेल्या या मोठ्या घसरणीमुळे आता त्यांचे नेटवर्थ कमी होऊन २३२ अरब डॉलर झाले आहे.

Elon Musk Networth
Elon Musk : 'आमच्याकडे दुसरा पर्याय नाही, सरकारचं ऐकावंच लागतं'; जॅक डॉर्सीच्या आरोपांवर इलॉन मस्कची प्रतिक्रिया

टॉप १० श्रीमंतांचीही संपत्ती घसरली

एकट्या इलॉन मस्क यांचीच नाही तर टॉप १० मध्ये असणाऱ्या सर्वांच्याच संपत्तीत घट झाली आहे. यात जेफ बेजोस यांचे १.०२ अरब डॉलर्स तर लॅरी पेज यांचे २ अरब डॉलर्स पेक्षा जास्त नुकसान झाले आहे. याशिवाय बर्नार्ड अर्नाल्ट पासून ते बिल गेट्स, वॉरेन बफेपर्यंत सर्वांचीच संपत्ती कमी झाली आहे.

मुकेश अंबानी संपत्ती

  • दरम्यान मुकेश अंबानी यांची संपत्ती ३३० मिलीयन डॉलर्स वरून वाढून ८८.७ अरब डॉलर्सवर पोहचली आहे.

  • तर गौतम अदानी यांना २२३ मिलीयन डॉलर्सचा फायदा झाला आहे. त्यांची संपत्ती ६१.६ अरब डॉलर्स झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.