Elon Musk: 'तिला' ट्विटरवरुन काढायला इलॉन मस्क तयार नाही! कोण आहे ती?

प्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्कच्या हातात ट्विटरची सुत्रं आली आणि वेगवेगळे बदल व्हायला सुरुवात झाली
Elon Musk
Elon Muskesakal
Updated on

Elon Musk not fire Twitter employee McSweeney: प्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्कच्या हातात ट्विटरची सुत्रं आली आणि वेगवेगळे बदल व्हायला सुरुवात झाली. त्यानं व्टिटरचा कार्यभार पाहायला सुरुवात केल्यानंतर कर्मचाऱ्यांना दणका द्यायला सुरुवात केली. जगभरातील कित्येक कर्मचाऱ्यांची त्यानं कपात केली. भारतातील कर्मचाऱ्यांना देखील त्यानं आपला हिसका दाखवल्याचे दिसून आले.

सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा सुरु आहे, ती म्हणजे इलॉन मस्क एका महिला सहकाऱ्याला काहीही झालं तरी ट्विटरवरुन काढायला तयार नाही. ती महिला कर्मचारी देखील तिच्या पदाचा राजीनामा देणार अशी चर्चा व्हायरल होत असताना तिचा राजीनामा नामंजूर करण्यात आला. ट्विटरचा मालक झाल्यानंतर तातडीनं भारतीय सीईओची इलॉननं हाकलपट्टी केली होती. मात्र आता तो एका व्यक्तीच्या बाबत एवढा संवेदनशील का झाला आहे असा प्रश्न त्याला विचारला गेला आहे.

हेही वाचा - भारतीय उत्पादनांच्या खरेदीतली वाढ बनवेल देशाला आर्थिक महासत्ता...

ट्विटरच्या व्हाईस प्रेसिडेंट पदावर कार्यरत असलेल्या मॅकस्विनी या व्यक्तीसाठी पॉलिसीमध्ये बदल केल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी मस्कनं बऱ्याच महत्वाच्या व्यक्तीनं त्याच्या कंपनीतून काढून टाकले आहे. असे असताना त्यानं मॅकस्विनीच्याबाबत नरमाईचे धोरण समोर ठेवले आहे. मुळच्या आर्यलंडच्या असणाऱ्या मॅकस्विनी यांनी याप्रकरणाविषयी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. ट्विटर ग्लोबलच्या व्हाईस प्रेसिडेंट अशी मॅकस्विनी यांची पोस्ट आहे. हे प्रकरण आता कोर्टातही गेल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

Elon Musk
Udayanraje Bhosale : शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्यांना उदयनराजेंचा इशारा

असेही म्हटले जाते की, मॅकस्विनी यांना देखील कंपनीकडून कामावरुन काढण्याची नोटीस पाठवण्यात आली होती. मात्र त्यांनी याप्रकरणी कोर्टात धाव घेऊन आपण कंपनीसाठी केलेले काम, कामाचे तास आणि धोरणं ठरविण्यात घेतलेली भूमिका याविषयी बाजू मांडली आहे.त्यामुळे तुर्तास मस्कनं त्यांच्यावरील कारवाई थांबवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.