Elon Musk: “नियम पाळा नाहीतर...”,भारतातील सोशल मीडिया सेन्सॉरशिपबद्दल इलॉन मस्क यांचं मोठं वक्तव्य

इलॉन मस्क यांनी भारतातील सोशल मीडियावरील सेन्सॉरशिपवर भाष्य केलं
elon musk
elon musk sakal
Updated on

गेल्या काही दिवसांपासून ट्विटर आणि कंपनीचे मालक इलॉन मस्क खूप चर्चेत आहेत. मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यापासून ते अनेक नवनवीन बदल करताना दिसून येतात. अशातच इलॉन मस्क हे मागील काही दिवसांपासून अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सेन्सॉरशिपबद्दल सातत्याने आवाज उठवतवताना दिसत आहेत.

ट्विटर ही सोशल मीडिया कंपनी विकत घेतल्यानंतर त्यांनी बंदी घातलेली अनेक ट्विटर खाती पुन्हा एकदा आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर परत आणण्याची घोषणा केली. ट्विटर खरेदी करण्याच्या आधीपासून ते सोशल मीडियावरील सेन्सॉरशिपच्या विरोधात आवाज उठवत आहेत. पण भारतातील सोशल मीडियावरील सेन्सॉरशिपबाबत त्यांनी वेगळं मत व्यक्त केलं.

elon musk
विद्यार्थ्यांनो, जातवैधताची चिंता नको! १५ दिवसांत मिळेल प्रमाणपत्र; ‘ही’ कागदपत्रे जोडून ’इथे’ अर्ज करा

‘बीबीसी’ला दिलेल्या एका मुलाखतीत ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनी भारतातील सोशल मीडियावरील सेन्सॉरशिपवर भाष्य केलं. “भारतात सोशल मीडियावर कठोर निर्बंध आहेत. त्यामुळे आमची वेबसाइट अमेरिका किंवा इतर पाश्चात्य देशांतील ट्विटर वापरकर्त्यांना जेवढं स्वातंत्र देते, तेवढंच स्वातंत्र्य भारतीय ट्विटर वापरकर्त्यांना देऊ शकत नाही” असं त्यांनी म्हंटलं आहे.

मस्क यांनी पुढे सांगितलं की, ट्विटर कंपनी कधीकधी भारतात काही मजकूर सेन्सॉर करते. तसेच काही मजकूर ब्लॉक केला जातो. जर कंपनीने भारत सरकारचे नियम पाळले नाहीत, तर आमच्या (ट्विटर) कर्मचाऱ्यांना तुरुंगात पाठवले जाऊ शकते.

elon musk
Fancy Number Plate : फॅन्सी नंबर प्लेटसाठी मिळालेले १२२ कोटी दुबई सरकार या कामासाठी वापरणार

“सोशल मीडियावर कोणता मजकूर दिसायला हवा? याबाबत भारतात कठोर नियम आहेत. त्यामुळे आम्ही एका देशाच्या नियमांच्या विरोधात जाऊ शकत नाही. एकतर आमचे लोक तुरुंगात जातील किंवा आम्हाला नियम पाळावे लागतील, असे दोनच पर्याय आमच्याकडे असतील तर आम्ही नियमांचं पालन करू,” असंही पुढे मस्क यांनी म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()