SpaceX Starship Explode : उड्डाणानंतर काही मिनिटांत ‘स्टारशिप’चे तुकडे

‘स्पेसएक्स’ने घेतलेली चाचणी अयशस्वी; प्रक्षेपक समुद्रात कोसळला
elon musk s SpaceX Starship world biggest rocket explodes minutes after launch
elon musk s SpaceX Starship world biggest rocket explodes minutes after launch sakal
Updated on

साऊथ पॅडर आयलँड (अमेरिका) : अमेरिकेतील खासगी अवकाश तंत्रज्ञान कंपनी ‘स्पेसएक्स’ने आज ‘स्टारशिप’ या मोठ्या प्रक्षेपकाची घेतलेली चाचणी अयशस्वी ठरली. ‘स्टारशिप’चे प्रक्षेपण झाल्यानंतर काही मिनिटांतच स्फोट होऊन बूस्टरसह प्रक्षेपक समुद्रात कोसळले.

‘स्पेसएक्स’ ही प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांची कंपनी आहे. चारशे फूट उंचीचे स्टारशिप हा भलामोठा प्रक्षेपक अवकाशात सोडून पृथ्वीप्रदक्षिणा करण्याचे ‘स्पेसएक्स’चे उद्दीष्ट होते. या प्रक्षेपकाची आज केवळ चाचणी असल्याने त्यावर कोणताही उपग्रह अथवा अवकाश यान नव्हते. टेक्सासच्या दक्षिण टोकाला मेक्सिकोच्या सीमेनजीक असलेल्या बेटावरून ‘स्टारशिप’चे प्रक्षेपण करण्यात आले.

हे प्रक्षेपण पाहण्यासाठी नजीकच्या परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती. ‘स्टारशिप’चे प्रक्षेपण सोमवारीच (ता. १७) होणार होते. मात्र, इंधनाच्या टाकीत तांत्रिक बिघाड आढळल्याने प्रक्षेपण लांबणीवर टाकण्यात आले होते.

‘स्टारशिप’ हा स्पेसएक्सने तयार केलेला आतापर्यंतचा सर्वांत मोठा आणि शक्तिशाली प्रक्षेपक होता. मात्र, प्रक्षेपण होताच काही मिनिटांतच प्रक्षेपकापासून बूस्टर वेगळे होण्याचा टप्पा अनियंत्रित होऊन जगाला फेरी मारण्यासाठी निघालेला प्रक्षेपक हवाई बेटांजवळ प्रशांत महासागरात कोसळला.

‘नासा’लाही धक्का

‘स्टारशिप’च्या मदतीने चंद्रावर आणि नंतर मंगळावरही अवकाशवीरांना नेण्याची ‘स्पेसएक्स’ची योजना आहे. अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था असलेल्या ‘नासा’नेही त्यांच्या पुढील चांद्रमोहिमेसाठी ‘स्टारशिप’चीच मागणी केली आहे. याशिवाय, अवकाश पर्यटनासाठीही त्याचा वापर करण्याचे नियोजन आहे. आजची चाचणी अयशस्वी झाल्याने ‘नासा’च्या योजनांना धक्का बसल्याचे मानले जात आहे.

यातूनही आम्ही शिकू

‘स्टारशिप’ची चाचणी अयशस्वी ठरली असली तरी स्पेसएक्स कंपनीने सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. ‘आपण घटनांमधून काय शिकतो, यावर पुढील यश अवलंबून असते. आजच्या चाचणीमुळे स्टारशिपची विश्‍वासार्हता वाढविण्यासाठी आम्हाला मदत होईल,’ असे कंपनीने म्हटले आहे. कंपनीचे प्रमुख एलॉन मस्क यांनीही, ‘पुढील काही महिन्यात होणाऱ्या नव्या चाचणीसाठी आम्हाला आज बरेच काही शिकायला मिळाले,’ असे ट्विट केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.