पंतप्रधानांची तुलना हिटरलशी; मस्क यांनी ते ट्विट केलं डिलिट

Elon Musk
Elon Musk
Updated on
Summary

टेस्लाचे सीईओ आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलन मस्क यांनी केलेलं एक ट्विट काही काळाने डिलिट केलं.

ओटावा - टेस्लाचे सीईओ आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलन मस्क (Elon Musk) यांनी केलेलं एक ट्विट काही काळाने डिलिट केलं. मात्र त्यांच्या या डिलिट केलेल्या ट्विटवरून आता सोशल मीडियावर वाद निर्माण झाला आहे. एलन मस्क यांनी कॅनडाचे (Canada) पंतप्रधान जस्टिन ट्रुडो (justin treaudo) यांची तुलना अडॉल्फ हिटलरशी (Adolf Hitler) केली होती. मस्क यांनी ट्रुडो यांची तुलना हिटलरशी करताना एक मीम ट्विट केलं होतं. त्यात म्हटलं होतं की, माझी तुलना जस्टिन ट्रुडोशी करणं बंद करा. माझ्याकडे बजेट होतं.

मस्क यांच्या या ट्विटवर अमेरिकन यहुदी समितीने प्रतिक्रिया दिली आहे. लाखो लोकांचा नरसंहार करणाऱ्या हिटलरशी ट्रुडो यांची तुलना करणं चुकीचं असल्याचं समितीने म्हटलं आहे. तसंच मस्क यांनी माफी मागावी अशी मागणीही समितीने केली आहे. मस्क यांनी पुन्हा एकदा चुकीच्या पद्धतीने तुलना केली आहे. तसंच त्यांचे हे कृत्य स्वीकारार्ह नाही असं समितीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

Elon Musk
रशिया-युक्रेनमध्ये तणावाचं वातावरण; भारताने स्पष्ट केली भूमिका

मस्क यांनी क्रिप्रोटकरन्सी ट्रेड पब्लिकेशन कॉइन डेस्कच्या पोस्टला उत्तर देताना मीम पोस्ट केलं होतं. यामध्ये ट्रुडो यांनी आणीबाणीच्या आदेशाचा उल्लेख केला होता. यात त्यांनी आंदोलन करणाऱ्यांच्या निधीत कपात करण्याचे संकेत दिले आहेत. आंदोलकांनी सीमेवरील वाहतूक रोखली असून कॅनडाच्या राजधानीत ठिय्या मांडला आहे. दुसरीकडे ट्विटरच्या एका प्रवक्त्याने सांगितलं की, त्यांनी एलन मस्क यांच्या ट्विटवर अॅक्शन घेतलेली नाही.

कॅनडाच्या इतिहासात दुसऱ्यांदा आणीबाणी लागू करण्यात आली आहे. ट्रक आणि इतर वाहनांमधून हजारो आंदोलनक ओटावाच्या रस्त्यावर गेल्या दोन आठवड्यापासून आहेत. आंदोलक कोरोना लस बंधनकारक करण्याच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.