Elon Musk In Israel : युद्ध सुरु असतानाच इलॉन मस्क इस्राइल दौऱ्यावर; गाझाबद्दल केलं मोठं वक्तव्य

Elon Musk In Israel : युद्ध सुरु असतानाच इलॉन मस्क इस्राइल दौऱ्यावर; गाझाबद्दल केलं मोठं वक्तव्य
Updated on

टेस्ला सीईओ इलॉन मस्क सध्या इस्त्राइल दौऱ्यावर आहेत. हमास आणि इस्त्राइल यांच्यात सुरु असलेल्या युद्धादरम्यान त्यांचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. या दरम्यान त्यांनी इस्त्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि राष्ट्रपती इसाक हर्जोग यांची भेट घेतली.

गाझा पट्टीच्या जवळ किबुत्ज शहराचा दौरा देखील मस्क यांनी केला. हमासने किबुत्ज या शहरावर सात ऑक्टोबर रोजी हल्ला केला होता, ज्यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू देखील झाला होता. मस्क यांच्या दौऱ्याविषयी नेतन्याहू यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, मस्क यांना किबुत्ज मध्ये हमासच्या सैनिकांनी केलेल्या नरसंहाराची भीषणता दाखवली, तसेच आम्ही किबुत्ज येथील पीडितांच्या घरी देखील गेलो.

नेतन्याहू यांनी मस्क यांना किबुत्ज शहरातील नागरिकांची घरे आणि आयडीएफने तयार केलेली फिल्म देखील दाखवली. या फिल्ममध्ये सात ऑक्टोबर रोजी हमासने इस्त्राइलवर केलेल्या हल्ल्याची भीषणता दाखवण्यात आली आहे.

या दरम्यान मस्क यांनी नेतन्याहू यांच्यासोबत एक्सवर लाइव्ह चॅट करतेवेळी सांगितलं की, हमासच्या अंताशिवाय कुठलाही पर्याय नाही, हत्यारांचा नायनाट नक्कीच झाला आहे. लोकांना मारेकरी बनवणारा प्रोपगंडा बंद झाला पाहिजे. गाझाच्या भविष्यासाठी हे गरजेचे आहे, मी गाझा पुन्हा उभे करण्यासाठी आणि युद्धानंतर गाझाच्या चांगल्या भविष्यासाठी मदत करेल.

काही दिवसांपूर्वी इलॉन मस्क यांना ज्यू लोकांविरोधी ट्वीटचे समर्थन केल्याने टीकेला सामोरे जावे लागले होते, त्यांच्यावर ज्यू विरोधाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप होता. त्यांनी अशा प्रकारच्या एका ट्वीटला रिप्लाय दिला होता. यानंतर मस्क यांच्यावर टीका करण्यात आली होती. आता अनेक रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात येत आहे की ज्यू विरोधी प्रतिमा साफ करण्यासाठी ते इस्त्राइल भेटीवर गेले आहेत.

Elon Musk In Israel : युद्ध सुरु असतानाच इलॉन मस्क इस्राइल दौऱ्यावर; गाझाबद्दल केलं मोठं वक्तव्य
Earthquake: पहाटेच्या सुमारास तीन देशांना भूंकपाचे धक्के! पाकिस्तान, तिबेट आणि पापुआ न्यू गिनी भूकंपाने हादरले
Elon Musk In Israel : युद्ध सुरु असतानाच इलॉन मस्क इस्राइल दौऱ्यावर; गाझाबद्दल केलं मोठं वक्तव्य
Israel-Hamas War : शस्त्रसंधीचा काळ वाढविण्याचे प्रयत्न; मध्यस्थ देशांकडून इस्राईल आणि हमासवर दबाव

हमास आणि इस्त्राइल यांच्यामध्ये सात ऑक्टोबरपासून युद्ध सुरू आहे . हमासने पाच हजारहून अधिक रॉकेट दागत इस्त्राइलवर हल्ला केला होता. यानंतर इस्त्राइलचे पंतप्रधान बेंजमिन नेतन्याहू यांनी हमासविरोधात युद्धाची घोषणा केली होती. या युद्धात गाझा पट्टी पुर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे.

इस्त्राइल आणि हमास यांच्या युद्धात मारल्या गेलेल्या पॅलेस्टाईनच्या नागरिकांची संख्या १४ हजारहून अधिक झाली आहे. तर आतापर्यंत गाझामधून २३ लाखांपैकी अर्धे नागरिक आपापले घर सोडून निघून गेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.