Afghan women : अफगाणी महिलांना पुन्हा अधिकार द्या!

‘यूएन’ शिष्टमंडळाचे तालिबान्यांना आवाहन; काही अधिकारी सकारात्मक
Empower Afghan women again UN delegation appeals to Taliban
Empower Afghan women again UN delegation appeals to Taliban sakal
Updated on

न्यूयॉर्क : अफगाणिस्तानमधील महिला आणि मुलींना अधिकार देण्याचे आणि त्यांच्यावरील अत्याचार थांबविण्याचे आवाहन संयुक्त राष्ट्रां (यूएन)मधील सर्वोच्च पदावरील महिलेच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने तालिबानला केले.

‘यूएन’च्या उपसरचिटणीस अमिना मोहमंद यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अफगाणिस्तानला भेट दिली. चार दिवसांचा त्यांचा दौरा शुक्रवारी (ता.२०) संपला. तेथील महिलांना त्यांचे अधिकार पुन्हा बहाल करण्यासाठी तालिबानचे काही अधिकारी सकारात्मक होते, पण अन्य अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे विरोध दर्शविला, अशी माहिती ‘यूए’च्या एका प्रवक्त्याने दिली. शिष्टमंडळाने काबूल आणि कंदहारमध्ये तालिबान्यांची चर्चा केली. पण बैठकीत सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांची नावे उघड केली नाहीत.

तालिबानी संघटनेने २०२१मध्ये अफगाणिस्तानचा ताबा घेत सत्ता स्थापन केली. त्यानंतर त्यांना देशातील महिला आणि मुलींवर लादलेल्या निर्बंधांवर शिष्टमंडळाने बैठकीत लक्ष केंद्रित केले होते. ‘‘काही तालिबानी अधिकाऱ्यांचा भूमिका सहकार्याची होती.

त्यामुळे काही सकारात्मक घडण्याची अपेक्षा अमिना मोहंमद यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला वाटत आहे,’’ असे ‘यूएन’चे उपप्रवक्ते फरहान हक यांनी सांगितले. त्यांचे विचार सकारात्मक होते अशा तालिबानी अधिकाऱ्यांची सामंजस्य निर्माण करणे ही महत्त्वपूर्ण बाब आहे.

तालिबान्यांमध्ये अधिकार देण्यावरून वेगवेगळी मते आहेत. त्यांनी आमच्या उद्दिष्टांवर संयुक्तपणे काम करावे, असे संयुक्त राष्ट्राला वाटते. यात महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे महिला आणि मुलींना अधिकार बहाल करण्याचे आहे, यावर हक यांनी जोर दिला.

‘यूएन महिला’ विभागाच्या कार्यकारी संचालक सीमा बहोस, राजकीय घडामोडींसंबंधी विभागाच्या सहाय्यक महासचिव खालेज खियारी यांच्यासह नायजेरियाचे माजी कॅबिनेट मंत्री आणि एक मुस्लिम व्यक्ती यांच्या शिष्टमंडळात समावेश होता. बहोस या लैंगिक समानता आणि महिला अधिकारांसाठी काम करतात.

हक म्हणाले, की महिला आणि मुलींच्या मूलभूत अधिकारांच्या विचार करता आम्ही जे पाहिले ते मागे नेणारे पाऊल आहे. खूप काही करण्याचा आमचा प्रयत्न असून आम्ही त्यादृष्टिने यापुढेही काम करत राहू. ‘‘अफगाणिस्तानमधील महिला आणि मुलींचे अधिकार हिरावून आणि समाजाला त्यांच्या सेवेपासून वंचित ठेवणाऱ्या या निर्बंधांमुळे त्यांचे भविष्य घरात कोंडले जाणार आहे, असे मी तालिबानला स्पष्टपणे सुनावले आहे,’’ असे अमिना मोहंमद यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

‘यूएन’ने मागितली माफी

‘यूएन’च्या शिष्टमंडळाने अफगाणिस्तानच्या दौऱ्यात तालिबानी झेंड्यासह छायाचित्र काढले. यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर टीका झाल्यानंतर शिष्टमंडळाच्या या कृतीबद्दल ‘यूएन’ला माफी मागावी लागली आहे. या शिष्टमंडळाने तालिबानच्या झेंड्यासह छायाचित्र काढून ते सोशल मीडियावर पोस्ट केले.

यानंतर सर्व बाजूने टीका होऊ लागली आणि ‘यूएन’ची निष्पक्षता आणि अखंडत्वावर प्रश्‍न उपस्थित होऊ लागले आहेत. यामुळे ‘यूएन’वर माफी मागण्याची वेळ आली. तालिबानी झेंड्याला अद्याप राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळालेली नाही.

शांततेने जगणारा आणि शेजाऱ्यांशीही शांततापूर्ण संबंध ठेवणारा, सतत विकासाच्या मार्गावर चालणारा समृद्ध अफगाणिस्तान असावा, अशी आमची महत्त्वाकांक्षा आहे. पण सध्या हा देश भीषण मानवी संकटाला तोंड देत आहे.

- अमिना मोहंमद, उपसरचिटणीस, ‘यूएन’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.