मास्कसह सर्व निर्बंध हटवण्याचा ब्रिटनचा निर्णय; पंतप्रधानांची घोषणा

UK PM Boris Johnson Announcement
UK PM Boris Johnson Announcement
Updated on
Summary

निर्बंध हटवण्याची घोषणा करताना पंतप्रधान म्हणाले की, बाहेर फिरण्यासाठी लसीकरण प्रमाणपत्राची गरज नाही, तसंच मास्कबद्दल लोकांनी विवेकबुद्धीने निर्णय़ घ्यावा.

लंडन : जगभरात कोरोना (Corona) रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत आहे. काही देशांमध्ये आतंरराष्ट्रीय प्रवासावरही निर्बंध घातले आहेत. तर देशांतर्गत काही कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. ब्रिटनमध्येही (Britain) कोरोनाचा उद्रेक बघायला मिळत आहे. मात्र तरीही पंतप्रधान बोरिस जॉन्सन (PM Boris Johnson) यांनी बुधवारी एक मोठी घोषणा केली. देशात मास्कसह इतर निर्बंध हटवण्याचा निर्णय़ त्यांनी घेतला. पुढच्या गुरुवारपासून मास्क घालणं बंधनकारक राहणार नाही. तसंच कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटला ओमिक्रॉन (Omicron) रोखण्यासाठी लागू करण्यात आलेले इतर निर्बंधही हटवण्यात येतील. देशात ओमिक्रॉन रुग्णांची संख्या वाढत असताना त्याबद्दल तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. (UK PM Boris Johnson Announcement)

बोरिस जॉन्सन म्हणाले की, कोविड प्लॅन बी अंतर्गत लागू करण्यात आलेल्या निर्बंधातून सूट देण्यात येणार आहे. त्यामुळे वर्क फ्रॉम होम करा असं लोकांना सांगितलं जाणार नहाी. तसंच मोठ्या संख्येनं एकत्रित येण्यासाठी कोरोना लसीकरण प्रमाणपत्रही बंधनकारक नसेल. सरकारकडून लोकांना प्रत्येक ठिकाणी मास्क घालण्याची सक्ती केली जाणार नाही. लोकांनी विवेकबुद्धीने मास्क घालायचा की नाही हे ठरवावं. तसंच लवकरच शाळांमध्येही मास्कची सक्ती रद्द केली जाईल असेही जॉन्सन यांनी म्हटले.

UK PM Boris Johnson Announcement
Air India | 5 जी मोबाईल सेवेचा हवाई सेवेला अडथळा

संसदेत बोलताना बोरिस जॉन्सन यांनी म्हटलं की, नव्या आकडेवारीनुसार देशात ओमिक्रॉनने उच्चांकी पातळी गाठली आहे. त्यानतंर निर्बंधात शूट दिली जाऊ शकते. यासाठी सकाळी मंत्रीमंडळाने निर्णय घेतला की बूस्टर डोसची मोहिम आणि जनतेकडून प्लॅन बीच्या खबरदारीच्या उपायांबद्दल आलेल्या प्रतिक्रियांच्या पार्श्वभूमीवर पुढच्या आठवड्यापासून प्लॅन ए अंमलात आणला जाईल. त्यानुसार प्लॅन बीचे निर्बंध संपुष्टात केले जातील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()