तालिबानची पुनरावृत्ती? TPLF दहशतवादी राजधानीच्या दिशेने; इथिओपियामध्ये आणीबाणी

तालिबानची पुनरावृत्ती? TPLF दहशतवादी राजधानीच्या दिशेने; इथिओपियामध्ये आणीबाणी
Updated on

Ethiopia Declares Nationwide Emergency: अफगाणिस्तानातील कट्टर विचारसरणीचा गट तालिबान अधिक आक्रमक झाला आणि त्याने थेट देशातील सत्तेविरोधातच चाल केली. हळू हळू एकेक शहरे ताब्यात घेत गेलेल्या तालिबानने सरतेशेवटी राजधानी आणि अंतिमत: देशावरच ताबा मिळवला. अशाच काहीशा घटनेची पुनरावृत्ती आता इथिओपिया या देशात पहायला मिळत आहे. या देशातील टीग्रे भागात असणाऱ्या एक कट्टर समूहाने आता देशातील सत्तेविरोधात पुकारलेला संघर्ष (Civil War in Ethiopia) अधिक तीव्र केला आहे. देशातील प्रमुख शहरांना एकेक करत ताब्यात घेत चाललेल्या या दहशतवादी गटापासून (Tigray People’s Liberation Front) नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी आता इथिओपियाच्या मंत्रिमंडळाने काल मंगळवारी देशव्यापी आणीबाणी (Ethiopia Emergency) घोषित केली आहे. त्या देशातील टीग्रे बंडखोरांनी राजधानीच्या दिशेने कूच केली आहे. तसेच थेट दोन महत्त्वाची शहरे आपल्या ताब्यात घेतली आहेत.

तालिबानची पुनरावृत्ती? TPLF दहशतवादी राजधानीच्या दिशेने; इथिओपियामध्ये आणीबाणी
डेंगीच्या संसर्गाला रोखणार ‘चांगले डास’

इथिओपियाने मंगळवारी देशव्यापी आणीबाणीची घोषणा केली आहे. टीग्रेयन बंडखोर आक्रमण करण्याची भीती असताना गरज भासल्यास राजधानी अदिस अबाबामधये राहणाऱ्या रहिवाशांना आपापल्या शेजाऱ्यांचे रक्षण करण्यास तयार राहण्यासाठीचेही आदेश दिले आहे. टीग्रे पीपल्स लिबरेशन फ्रंट (टीपीएलएफ) हा बंडखोर गट अनेक दिवसांपासून आपल्या कारवाया वाढवत होता. त्यानंतर आता ते थेट राजधानीकडे चाल करुन निघाले आहेत. देशाचे पंतप्रधान अबी अहमद यांच्या सत्तेविरुद्ध वर्षभर चाललेल्या क्रूर अशा युद्धानंतर या गटावर बंदी घालण्यात आली होती.

"देशातील अनेक भागांमध्ये दहशतवादी TPLF गटाकडून होत असलेल्या अत्याचारांपासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी ही आणीबाणी लागू केली असल्याचं मत असे शासनाची भूमिका मांडणाऱ्या फना ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेटने म्हटलंय. तसेच अदीस अबाबामधील अधिकाऱ्यांनी आपल्या नागरिकांना राजधानीच्या सुरक्षेसाठी तयार राहण्याचंही आवाहन केलं आहे. टायग्रे या दहशतवादी संघटनेने इथिओपियाच्या दोन प्रमुख शहरांवर आधीच ताबा मिळवला आहे. गेल्या एक वर्षांपासून या कट्टर समूहाचे लोक सरकारशी संघर्ष करत आहेत. टायग्रेचे काही लोक आणखी काही बंडखोर समूहांसोबत सैन्यात सामील झाले असून ते सरकारशी असलेला संघर्ष अधिक तीव्र करण्याच्या तयारीत आहेत.

तालिबानची पुनरावृत्ती? TPLF दहशतवादी राजधानीच्या दिशेने; इथिओपियामध्ये आणीबाणी
तुम्ही इस्रायलमध्ये सर्वात लोकप्रिय, माझ्या पक्षात या! मोदींना निमंत्रण

PM अबी अहमदना 2019 मध्ये शांततेचा नोबेल
इथिओपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना ऑक्टोबर 2019 मध्ये शांततेचा नोबेल प्रदान करण्यात आला होता. इरिट्रियासोबतचा 20 वर्षांचा संघर्ष संपुष्टात आणल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. मात्र, देशाच्या टायग्रे भागात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर पंतप्रधानांच्या चिंता आणखी वाढल्या होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()