मृत्यूच्या दारातून परतले; मायदेशी येताच 'भारत माता की जय'चा घोष

Afghanistan
Afghanistan
Updated on
Summary

अभूतपूर्व परिस्थितीत अनेक भारतीय अफगाणिस्तानमध्ये अडकून पडले आहेत. अशात भारतीयांना परत आणण्यासाठी सरकारने मोहीम राबवली आहे

नवी दिल्ली- अभूतपूर्व परिस्थितीत अनेक भारतीय अफगाणिस्तानमध्ये अडकून पडले आहेत. अशात भारतीयांना परत आणण्यासाठी सरकारने मोहीम राबवली आहे. याअंतर्गत भारतीयांना मायदेशी आणलं जात आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, नुकतेच 87 भारतीयांना काबूलमधून दिल्लीत आणण्यात आले आहे. AI 1956 विमानाने 87 भारतीयांना आणि दोन नेपाळी नागरिकांना काबूलमधून ताजिकिस्तानमध्ये आणले. त्यानंतर विमानाने दिल्लीकडे उड्डाण केले होते. सकाळी पाच वाजता हे विमान भारतात पोहोचले. (Internatinal Latest News)

परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे. विमानामधील भारतीय नागरिक 'भारत माता की जय'चा घोष करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. भारतीयांना दिल्लीत आणण्याच्या या मोहिमेमध्ये ताजिकिस्तानमधील दुशांबेतील दुतावासाने मदत केली असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंधम बागची यांनी सांगितलं.

आणखी भारतीयांना आणलं जातंय देशात

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय एअर फोर्सचे C-17 एअरक्राफ्ट आज सकाळी 168 प्रवाशांसह काबूलमधून उड्डाण केले आहे. हे एअरक्राफ्ट गाझीयाबादमधील हिंडन या भारतीय एअर फोर्सच्या तळावर दुपारपर्यंत पोहोचेल. 168 प्रवाशांमध्ये 107 भारतीय आहेत. अरिंधम बागची यांनी ट्विट करुन यांसदर्भातील माहिती दिली आहे.

दरम्यान, नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन अर्थात NATO नं भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी सरकारला परवानगी दिली. सध्या नाटोचं काबूलच्या हमीद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळावर नियंत्रण आहे. दररोज दोन विमानांद्वारे अडकलेल्या नागरिकांना आपल्या देशात परत नेण्यास नाटोनं भारताला परवानगी दिली आहे. 25 विमानांचं सध्या नाटोकडून संचालन सुरु आहे. सध्या 300 हून अधिक भारतीयांना काबूलमधून बाहेर काढण्यात आलं आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.