इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये निवडणुकीचा निकाल लागून दोन आठवडे पूर्ण होत आले तरी अद्यापही सत्ता स्थापनेवरून निर्माण झालेला पेच सुटलेला नाही. सर्वाधिक जागा मिळालेल्या पाकिस्तान मुस्लिम लीग आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी या पक्षांमधील जागावाटपाबाबतच्या चर्चेची पाचवी फेरीही काल (ता. १९) निष्फळ ठरल्याने आता उद्या (ता. २१) पुन्हा चर्चा होणार असल्याचे पाकिस्तान मुस्लिम लीगच्या वतीने सांगण्यात आले. (even after fifteen days of general election in Pakistan govt will not be formed yet)
पाकिस्तान मुस्लिम लीगचे अध्यक्ष बिलावल भुट्टो यांना सत्तेमध्ये मोठा वाटा असून मुस्लिम लीगचे नेते नवाज शरीफ यांची तशी तयारी नाही. राजकीय तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, बिलावल भुट्टो हे चर्चेतून शरीफ यांना खेळवत ठेवत इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीके इन्साफ पक्षाबरोबर आघाडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. (Marathi Tajya Batmya)
निवडणुकीत सर्वाधिक संख्येने इम्रान यांचेच उमेदवार निवडून आले आहेत. मात्र, ते सर्व अपक्ष म्हणून लढले होते. आता त्यांना सुन्नी इत्तेहाद कौन्सिलमध्ये सामील होण्याच्या सूचना इम्रान यांनी दिल्या आहेत. या सर्वांची मदत घेत स्वत:कडे पंतप्रधानपद घेण्याचा बिलावल यांचा प्रयत्न असेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे बुधवारी होणाऱ्या चर्चेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बुशरा बिबींची तपासणी करा
पाकिस्तानमधील राजकीय परिस्थिती अद्यापही स्थिर झालेली नसतानाच विविध आरोपांचा सामना करणाऱ्या इम्रान खान यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. तोशाखाना प्रकरणी घरातच स्थानबद्धतेत असलेल्या इम्रान खान यांच्या पत्नी बुशरा बिबी यांची वैद्यकीय तपासणी करण्याची विनंती इम्रान यांच्या बहिणीने न्यायालयाकडे केली आहे. (Latest Marathi News)
बुशरा बिबी यांना अन्नातून विशिष्ट रासायनिक द्रव्य दिले गेल्याने त्यांच्या घशात आणि पोटात जळजळ होत असल्याचा आरोप इम्रान यांच्या बहिणीने केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.