वॉशिंग्टन : एव्हरेस्ट शिखर अंतराळातून कसे दिसत असेल तर याची उत्सुकता वाटत असेल तर ती ते सध्या आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात असलेले ‘नासा’चे अंतराळवीर मार्क वेंड ही यांनी नव्या वर्षात काढलेल्या छायाचित्रातून त्याचा शोध घेता येईल. पृथ्वीपासून ४०० किलोमीटर उंचीवरून काढलेल्या या छायाचित्रात बर्फाळ हिमालय महाकाय वृक्षासारखा दिसत आहे, ज्याची मुळे जमिनीवर पसरलेली आहेत. त्याच्यामध्ये एव्हरेस्ट नजरेस पडतो (Everest Mountain Picture 400km along from Earth)
एव्हरेस्टचे अद्भूत छायाचित्र मार्क यांनी ट्विटरवर शेअर केले आहे. त्याचबरोबर छायाचित्रात एव्हरेस्ट शोधून दाखवा, असेही आवाहनही त्यांनी केले आहे. सुमारे आठ हजार ८४९ मीटर उंच असलेला एव्हरेस्ट जमिनीवरून सहज दिसू शकतो. पण अंतराळातून त्याचा शोध घेणे आव्हानात्मक आहे. जेवढे बाहेर जाता येईल तेवढे जाण्याचा माझा नव्या वर्षाचा संकल्प आहे,’ पण तो मी पृथ्वीवर परतल्यावर,’’ असे ट्विट मार्क यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.